हवामान ग्रुप जॉईन करा
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग

Weather Alert: या तारखेला राज्यात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस; पुण्यासह 11 जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा

Weather Update: गेल्या दोन तीन दिवसांत पुण्यात देखील तापमानाचा पारा (Temperature in pune) घसरला असून राज्यात सर्वात कमी किमान तापमानाची (Lowest temperature in Maharashtra) नोंद पुण्यात झाली आहे.

10 नोव्हेंबर: अरबी समुद्रात निर्माण झालेलं हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र भारतीय किनारपट्टीपासून दूर गेल्यानंतर राज्यात आकाश निरभ्र झालं आहे. तर उत्तर पूर्व परिसरात हवेचा दाब वाढल्याने राज्यात किमान तापमानात बरीच घट झाली आहे. गेल्या दोन तीन दिवसांत पुण्यात देखील तापमानाचा पारा (Temperature in pune) घसरला असून राज्यात सर्वात कमी किमान तापमानाची (Lowest temperature  in maharashtra) नोंद पुण्यात झाली आहे. आज पहाटे पुणे जिल्ह्यातील हवेली याठिकाणी सर्वात कमी 10.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे पुण्यात पहाटे वातावरणात प्रचंड गारवा वाढला आहे.

हे पण वाचा -   Panjabrao Dakh Havaman Andaj : येत्या 4 दिवस राज्यात फक्त इथे होणार पाऊस, पंजाब डख यांचा नवीन हवामान अंदाज

दुसरीकडे, सध्या तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी परिसरात सध्या हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. पुढील एक-दोन दिवसांत हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 11 नोव्हेंबरपर्यंत तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टी भागात जोरदार पावसाच्या सरी कोसळणार आहेत. संबंधित परिसरात हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याचा काहीअंशी परिणाम महाराष्ट्रावर देखील होणार आहे.

हेही वाचा –  राज्यातील 36 जिल्ह्यांचे आजचे कापूस बाजारभाव

त्यामुळे विकेंडला महाराष्ट्रातील कोकण, घाट परिसर, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने शनिवारी (13 नोव्हेंबर) आणि रविवारी (14 नोव्हेंबर) पुण्यासह एकूण 11 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. शनिवारी राज्यात पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, उस्मानाबाद, बीड आणि लातूर या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. संबंधित जिल्ह्यात शनिवार आणि रविवारी विजांच्या कडकडाटासह जोरदार सरी कोसळणार आहेत.

हे पण वाचा -   Panjab Dakh Weather : 11 ते 17 ऑक्टोबर पर्यंतचा हवामान अंदाज!

हेही वाचा- आजचे महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांचे सोयाबीन बाजारभाव

दरम्यान, संबंधित जिल्ह्यात वेगवान वारे वाहणार असून या वाऱ्यांचा वेग ताशी 30 ते 40 किमी इतका असणार आहे. रविवारी देखील राज्यात हीच परिस्थिती कायम राहणार असून याच अकरा जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट दिला आहे. शनिवार आणि रविवार दोन्ही दिवशी पुण्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे विकेंड फिरायला जाण्याचा प्लॅन करणाऱ्या पुणेकरांनी लांबचा प्रवास टाळावा, असा सल्ला हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.

नावभारतीय हवामान विभाग यांचा अंदाज
विभागप्रादेशिक हवामान केंद्र मुंबई
पत्ताIMD Mumbai व IMD New Delhi
दिनांक10 नोव्हेंबर 2021
फेसबुकदररोज हवामान अंदाजासाठी फेसबुक पेज लाईक करा
WhatsAppहवामान अंदाज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
संकलनआजचे हवामान महाराष्ट्र 2021

शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अंदाज मिळवण्यासाठी व पंजाब डख हवामान अंदाज whatsapp group साठी आपल्या वेबसाईटचे नोटिफिकेशन सुरू करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अवश्य जॉईन व्हा. धन्यवाद!

हे पण वाचा -   Maharashtra Weather Update: थंडी सोबत अवकाळी पाऊस हजेरी लावणार का? पहा पुढील ३ दिवसांचा हवामान अंदाज

Web Title: Heavy rain with thunderstorms in the state on this date; Meteorological Department warns 11 districts including Pune

Styled Responsive Table
प्रधानमंत्री पीक विमा योजना महत्वाचे लेख
Arrow Icon₹२००० चा पुढील हफ्ता या दिवशी येणार Arrow Iconपीएम किसान न्यूज
Arrow Iconनोंदणी क्रमांक शोधा Arrow Iconई-केवायसी करा
Arrow Iconऑनलाइन दुरुस्ती करा Arrow Iconनवीन शेतकऱ्यांची नोंदणी करा
Arrow Iconलाभार्थ्यांची यादी पहा Arrow Iconहेल्पलाइन क्रमांक
Arrow Iconआधारवरून पीएम किसान स्टेटस तपासा Arrow Iconआधार वरून नाव दुरुस्ती करा
Arrow Iconपैसे परत करा Arrow Iconअपात्र शेतकऱ्यांची यादी पहा
Arrow Iconपीएम किसान पात्रता जाणून घ्या Arrow Iconऐच्छिक आत्मसमर्पण
Close Visit Havaman Andaj