Weather Update Maharashtra: नागपूरसह संपूर्ण विदर्भाला मंगळवारी परत एकदा वादळी पावसाने झोडपले. शहरात सकाळी व दुपारी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. जिल्ह्यात काटोल, नरखेड आणि रामटेक तालुक्यांत तुरळक ठिकाणी गारपीटही झाली. यामुळे रब्बी पिकांकडे आशा लावून बसलेला शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. पुढील दोन दिवस शहरात वादळी पावसाचा हा तडाखा कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
पुढील दोन दिवस वातावरण कायम राहण्याचा अंदाज
मध्यंतरी झालेल्या पावसानंतर वातावरण कोरडे होऊ लागले होते. परंतु, गेल्या आठवड्याच्या अखेरीस पुन्हा पावसाला सुरुवात झाली. प्रादेशिक हवामान खात्याने शहर, तसेच विदर्भाला ‘यलो अलर्ट’ही दिला आहे. याखेरीज, त्यापुढील दोन दिवस अर्थात शुक्रवार आणि शनिवारीसुद्धा वातावरण ढगाळच राहणार आहे. रविवारपासूनच वातावरण कोरडे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागपूरकरांचा हा आठवडा पावसाळी वातावरणात जाणार असल्याचे संकेत आहेत.
पुढील 4 दिवस पुन्हा कोसळणार सरी, या 9 जिल्ह्यांना येलो Alert
नागपूरकरांचा हा आठवडा पावसाळी वातावरणात जाणार असल्याचे संकेत आहेत. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी हे नागपूरकरिता हिवाळ्याचे महिने समजले जातात. मात्र, यंदा नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांमध्ये दर पंधरा दिवसांनी पावसाने हजेरी लावली. यंदा डिसेंबरमध्ये सर्वाधिक कमी ७.६ अंश इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली. हा यंदाच्या मोसमातील नीचांक होता. दरम्यान, मंगळवारी १७.५ अंश इतक्या किमान, तर २२.५ अंश इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली.
हे पण वाचा
हे पण वाचा –
- Havaman Andaj Today | इथे चक्रीवादळाचे संकेत; ‘या’ तारखेनंतर पावसाची शक्यता डॉ. मच्छिंद्र बांगर यांचा अंदाज
- Havaman Andaj Today: राज्यात पावसाचे आगमन; काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, गारपीट व वादळी वाऱ्याचा इशारा
- Rain Alert: महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस आणि गारपिटीचे संकट; ऑरेंज अलर्ट जारी
- आजचे हवामान अपडेट: महाराष्ट्रात तापमानाचा कहर! 37 अंशांच्या पार, नागरिक त्रस्त
- मोठी बातमी ! ऐन हिवाळ्यात ‘या’ भागात पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळणार, हवामान खात्याची चेतावणी







