हवामान ग्रुप जॉईन करा
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग
. .
. .
Trending Now

Weather Alert : मोचा चक्रीवादळाचा महाराष्ट्रालाही धोका वाढला! ‘या’ भागात पडणार वादळी वाऱ्यासह पाऊस, भारतीय हवामान विभागाचा इशारा

Weather Update : सध्या वातावरणात सातत्याने बदल होतोय. या बदलामुळे महाराष्ट्रासह देशभरात पाऊसाचे थैमान पाहायला मिळत आहे. आपल्या राज्यात तर मार्च, एप्रिल आणि मे महिन्याच्या सुरुवातीला मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील बहुतांशी जिल्ह्यात पाऊस झाला आहे.

अशातच बंगालच्या उपसागरात आता मोचा नावाच चक्रीवादळ तयार झाले आहे. काल बंगालच्या उपसागरातील खोल दाबाचे रूपांतर चक्रीवादळात झाल्याचे भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. याचाच अर्थ आता चक्रीवादळाची तीव्रता वाढणार आहे. यामुळे देशातील काही राज्यात वादळी पावसाची शक्यता तयार होत आहे.

बंगालच्या उपसागरालगत असलेल्या किनारपट्टीच्या भागात या चक्रीवादळामुळे वादळी पावसाची शक्यता राहणार आहे तर मैदानी भागात तापमानात कमालीची वाढ होणार आहे.

विशेष बाब म्हणजे या चक्रीवादळामुळे आपल्या राज्यातही पावसाची शक्यता आहे. या चक्रीवादळाचा प्रकोप आजपासून जाणवणार आहे. काल हे चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात तयार झाले असून आज बारा मे रोजी हे चक्रीवादळ जमिनीवर येणार आहे.

हे पण वाचा -   Monsoon 2021: पंजाब डख यांचा हवामान अंदाज ⛈️ 10 ऑक्टोबर ला इतक्या जिल्ह्यात पावसात विश्रांती

म्हणून याचा परिणाम आता बंगालच्या उपसागरा लगत असलेल्या किनारपट्टीच्या भागात आज दिसणार आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज 12 मे शुक्रवारी कर्नाटक, केरळ, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि अरुणाचल प्रदेशात चक्रीवादळामुळे वादळी पावसाची शक्यता आहे.

आज या भागात हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. आसाम, तामिळनाडू आणि तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील सिक्कीम भागांमध्ये एक किंवा दोन ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्‍यता देखील आहे.

त्याच वेळी, वायव्य, मध्य आणि पूर्व भारतात दिवसाचे तापमान आणखी वाढू शकते. विशेष बाब म्हणजे केल्या दोन-तीन दिवसांपासून महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात तापमानात मोठी वाढ झाली आहे.

काही भागात 40 ते 45 अंश सेल्सिअस पेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे. शिवाय या वादळामुळे तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे निश्चितच नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागणार आहे.

हे पण वाचा -   Weather Alert | पावसाळा नव्हे हा तर हिवसाळा…! आज ‘या’ ठिकाणी कोसळणार पाऊस, हवामान विभागाचा इशारा

Source – Ahemadnagarlive24

शेअर नक्की करा:
Close Visit Havaman Andaj