यंदा परतीच्या पावसाला विलंब होईल, (Weather Update) हवामान खात्याने वर्तवली शक्यता : राज्यभरात समाधानकारक हजेरी लावलेल्या पावसाचा परतीचा प्रवास यंदा लांबण्याची शक्यता आहे. जून आणि जुलैमध्ये राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. पण यानंतर ऑगस्ट महिन्यात कमी पावसाची नोंद झाली.
उद्याचा हवामान अंदाज
मात्र, आता सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने पुन्हा एकदा जोर पकडला आहे. त्यामुळे यंदा परतीच्या पावसाला विलंब होईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
हवामान विभागाने पुढच्या पाच दिवसात काही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. 10 आणि 11 सप्टेंबर रोजी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.
हवामान अंदाज महाराष्ट्र
तर 12 सप्टेंबर रोजी ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, नंदुरबार, धुळे, जळगाव, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर कोकण आणि घाटमाथ्यावर पाऊस वाढण्याची शक्यता असून, 12 आणि 13 सप्टेंबर रोजी पावसाचा प्रभाव वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
हे पण वाचा
हे पण वाचा:
- Havaman Andaj Today | इथे चक्रीवादळाचे संकेत; ‘या’ तारखेनंतर पावसाची शक्यता डॉ. मच्छिंद्र बांगर यांचा अंदाज
- Havaman Andaj Today: राज्यात पावसाचे आगमन; काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, गारपीट व वादळी वाऱ्याचा इशारा
- Rain Alert: महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस आणि गारपिटीचे संकट; ऑरेंज अलर्ट जारी
- आजचे हवामान अपडेट: महाराष्ट्रात तापमानाचा कहर! 37 अंशांच्या पार, नागरिक त्रस्त
- मोठी बातमी ! ऐन हिवाळ्यात ‘या’ भागात पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळणार, हवामान खात्याची चेतावणी








