मुंबई: भारतीय हवामान विभागाच्या मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राच्यावतीनं राज्यात येत्या 27 डिसेंबरपासून 29 डिसेंबरपर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. रविवारपासून ( 26 डिसेंबर ) वायव्य भारतावर व 27 डिसेंबरपासून मध्य भारतावर ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा (WD) प्रभाव पडण्याची दाट शक्यता असल्यानं महाराष्ट्रात 28-29 डिसेंबरला काही जिल्ह्यात गडगडाटासह पावसाची शक्यता व काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
के. एस. होसाळीकर यांचं ट्विट
राज्यात कुठं पाऊस पडणार
हवामान विभागानं 28 आणि 29 डिसेंबरसाठी यलो अॅलर्ट जारी केले आहेत. राज्यात 28 डिसेंबरला औरंगाबाद, जालना,जळगाव, परभणी, हिंगोली, यवतमाळ, वर्धा, अमरावती, नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह,हलका ते मध्यम पाऊस व वारा (30-40 किमी ताशी) शक्यता आहे. 27 ला विर्दभात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची
शक्यता आहे.
29 डिसेंबरला विदर्भ मराठवाड्यात पावसाचा अंदाज
नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी आणि जालना जिल्ह्यात पाऊस होऊ शकतो.
नांदेडमध्ये थंडीचा जोर वाढला
गेल्या काही दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला असून रात्रीच्या तापमानात कमालीची घट झाल्याचं पाहायला मिळालं. सकाळच्या सुमारास वातावरणात कडाक्याची थंडी जाणवली .वाढलेली थंडी रब्बी हंगामातील पिकांसाठी लाभदायक व पोषक ठरत आहे. गव्हाच्या ओंब्या धरण्याच्या अवस्थेत असलेल्या गव्हाला आणि फुले व घाटे धरण्याच्या अवस्थेतील हरभरा पिकाला थंडी फायदेशीर ठरत आहे.
निफाडमध्ये तापमान घटलं
उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात 6.5 अंश सेल्शिअस किमान तापमानाची नोंद झाली. गेल्या सात-आठ दिवसांपासून थंडीत वाढ झाली असून किमान तापमानात चढ-उतार होत असल्याने ख्रिसमसच्या दिवशी आज निफाड तालुका थंडीने गारठून निघाला आहे. या थंडी पासून बचावासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटू उब मिळवायचा प्रयत्न नागरिक करीत आहे. या वाढत्या थंडीमुळे द्राक्षबागेतील फुगवणी आलेल्या द्राक्षांना तडे जाण्याच्या भीती मुळे द्राक्ष उत्पादक चिंताग्रस्त झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आपले द्राक्षबाग वाचवण्यासाठी ठिकाणी द्राक्षबागेत शेकोट्या पेटवल्या जात आहे.
इतर बातम्या:
- Punjab Dakh यांचा एप्रिल महिन्यातील हवामान अंदाज ! ‘या’ तारखेला मुसळधार Rain पडणार पहा पंजाब डख हवामान अंदाज
- Weather Update | राज्यात आज ‘या’ ठिकाणी पावसाची शक्यता! हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज
- Maharashtra rain IMD Alert: 14 मार्चपासून ‘इतके’ दिवस राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस कोसळणार; ‘या’ जिल्ह्यात गारपीटीची शक्यता
- IMD Weather Alert : पावसाचे सावट कायम! येत्या २४ तासांत या राज्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार बरसणार; अलर्ट जारी
- Panjab Dakh Havaman Andaj | पंजाबराव डख यांचा 10 मार्चपर्यंत या 11 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा, पहा आजचा हवामान अंदाज