WeatherAlert: येत्या तीन दिवसांत राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा मुसळधार ते अतिमुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून (IMD Alerts) देण्यात आला आहे.
ऑगस्ट महिन्यांत महाराष्ट्रात मान्सूननं (Monsoon in Maharashtra) निराशा केल्यानंतर, आता सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला मान्सूननं राज्यात दिमाखात आगमन केलं आहे. मागील पाच-सहा दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी (Heavy Rainfall in Maharashtra) लावली आहे.
गेल्या चोवीस तासांत मुंबई (Mumbai), पुणे (Pune) आणि ठाणे (Thane) परिसरात अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. त्यानंतर आता येत्या तीन दिवसांत राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा मुसळधार ते अतिमुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून (IMD Alerts) देण्यात आला आहे.
सध्या बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस महाराष्ट्रात सर्वदूर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहेत. पूर्व विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात याचा सर्वाधिक प्रभाव राहणार आहे. उद्यापासून टप्प्याटप्प्यानं पाऊस विदर्याकडून कोकणाकडे सरकणार आहे. परिणामी पुढील तीन दिवस राज्यात अनेक जिल्ह्यांना हवामान खात्यानं हाय अलर्ट दिले आहेत.
हेही वाचा-राज्यातील ‘या’ 8 जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा
कोकणातील काही भागात अतिवृष्टीची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. उत्तर कोकणात याचा सर्वाधिक प्रभाव राहणार आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड या चार जिल्ह्यांना हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
हेही वाचा :
- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पंजाबराव डख यांचा २१ जून २०२५ पर्यंतचा हवामान अंदाज; ‘या’ जिल्ह्यांत जोरदार पाऊस | Punjab Dakh Havaman Andaj
- आजचे हवामान | या २२ जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात मुसळधार पाऊस
- महाराष्ट्रात मान्सूनने जोर धरला, अनेक भागांत ढगफुटीसदृश्य पाऊस, 2 जिल्ह्यांना रेड अलर्ट | Monsoon 2025
- Monsoon Update: मे महिन्यात कसे असेल हवामान, कुठे आहे पावसाची शक्यता? पहा हवामान विभागाचा अंदाज
- पुढील 4 दिवस या जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा 🌦️ 29 एप्रिल ते 2 मे हवामान अंदाज | Monsoon 2025
आज पुणे, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड अशी एकूण चौदा जिल्ह्यांना हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. संबंधित जिल्ह्यांत वेगवान वाऱ्याच्या साथीनं जोरदार सरी कोसळणार आहेत.
हेही वाचा-पंजाब डख हवामान अंदाज: लवकर मान्सून सक्रिय राज्यात जोरदार पाऊस । Maharashtra Weather Update
आजपासून पुढील तीन दिवस राज्यात पावसाचा जोर वाढतच जाणार आहे. उद्या आणि परवा देखील राज्यातील अनेक जिल्ह्यांना हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
उद्या संपूर्ण कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस बरसणार आहे. 8 सप्टेंबर रोजीही कमी अधिक प्रमाणात राज्यात हीच परिस्थिती कायम राहणार आहे. तसेच काही ठिकाणी अतिवृष्टी देखील होणार आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.