Weather Forecast: श्रीलंका (Srilanka) आणि तामिळनाडूच्या किनारपट्टी (Coastal area of Tamil Nadu) परिसरात हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र (low pressure area) निर्माण झालं आहे.
हवामान अंदाज डॉट इन: यंदाचे नैऋत्य मोसमी वारे माघारी परतल्यानंतर महाराष्ट्रासह देशात बहुतांशी ठिकाणी पावसाने (Rain in maharashtra) पूर्णपणे उघडीप घेतली आहे. दरम्यान दक्षिण आणि ईशान्य भारतात मात्र काही ठिकाणी जोरदार पाऊस (Heavy rainfall) कोसळला आहे. मान्सूनच्या परतीनंतर राज्यात पावसाने उसंत घेतली आहे.
पण आता राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक हवामान निर्माण होतं आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच जोरदार पावसाची हजेरी लागणार आहे. हवामान खात्याने 1 ते 3 नोव्हेंबर दरम्यान राज्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.
खरंतर, सध्या श्रीलंका (Srilanka) आणि तामिळनाडूच्या किनारपट्टी (Coastal area of Tamil Nadu) परिसरात हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र (low pressure area) निर्माण झालं आहे. पुढील तीन ते चार दिवसांत हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र पश्चिम दिशेने पुढे सरकणार आहे. त्यामुळे देशात अनेक ठिकाणी येत्या आठवड्यात पावसाची स्थिती आहे.
तामिळनाडू आणि आसपासच्या परिसरात तर पुढील 48 तासांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील काही तासांत याठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस धडकण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीचीही शक्यता आहे. त्यामुळे संबंधित परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
हेही वाचा-
- Havaman Andaj Today | इथे चक्रीवादळाचे संकेत; ‘या’ तारखेनंतर पावसाची शक्यता डॉ. मच्छिंद्र बांगर यांचा अंदाज
- Havaman Andaj Today: राज्यात पावसाचे आगमन; काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, गारपीट व वादळी वाऱ्याचा इशारा
- Rain Alert: महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस आणि गारपिटीचे संकट; ऑरेंज अलर्ट जारी
- आजचे हवामान अपडेट: महाराष्ट्रात तापमानाचा कहर! 37 अंशांच्या पार, नागरिक त्रस्त
- मोठी बातमी ! ऐन हिवाळ्यात ‘या’ भागात पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळणार, हवामान खात्याची चेतावणी
दुसरीकडे, महाराष्ट्रात गेल्या दोन आठवड्यापासून पावसाने उघडीप घेतल्यानंतर, आता पावसासाठी पोषक हवामान तयार होतं आहे. श्रीलंका आणि कर्नाटक राज्याच्या किनारपट्टी परिसरात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र पश्चिम दिशेने पुढे सरकणार आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात महाराष्ट्रात देखील अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
हे पण वाचा
विकेंडनंतर राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे. हवामान खात्याने 1 ते 3 नोव्हेंबर दरम्यान अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे.
30 Oct, 📢
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) October 30, 2021
1 – 3 नोव्हेंबरला राज्यात; दक्षिण कोकणात, दक्षिण मध्य महाराष्ट्रात व दक्षिण मराठवाड्याच्या
काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता. @RMC_Mumbai
– IMD pic.twitter.com/tNOjS46Vnu
हवामान खात्याने सोमवारी (1 नोव्हेंबर) सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. संबंधित जिल्ह्यात सोमवारी मेघरगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. मंगळवारी राज्यात हवामानाची स्थिती कायम राहणार असून अन्य भागात देखील तुरळक पावसाची शक्यता आहे.
बुधवारी मात्र हवामान खात्याने सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड या नऊ जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे. दरम्यान पुणे, रायगड, बीड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात देखील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.







