Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग

Weather Update : राज्यात मान्सून उशिरा येणार? मान्सून आगमनाची तारीख लांबणीवर

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn
Weather Update Will monsoon come late in the state Monsoon arrival date postponed

मुंबई, 04 जून : राज्यात मान्सून (Monsoon in Maharashtra) लवकर येणार अशी हवामान विभागाकडून (imd alert) माहिती देण्यात आली होती. दरम्यान मान्सून केरळमध्ये (monsoon in Kerala) दाखल होऊन काही जिल्ह्यात पावसाला सुरूवात अशीही माहिती देण्यात आली होती. परंतु मान्सून लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन 2 जूनला सीमेवर दाखल होणार होता परंतु मान्सून पूर्व पावसामुळे (pre monsoon rain) अद्याप मान्सूनचा पाऊस लांबणीवर जात असल्याचे दिसून येत आहे.

हवामान अंदाज महाराष्ट्र

मुंबईत 10 जूनला मान्सूनला (rain in Mumbai) सुरूवात होणार असे बोलले जात होते परंतु मान्सूनचा वेग मंदावल्याने यंदा पावसाला उशीरा सुरूवात होण्याची शक्यता आहे. दरम्यान राज्यात उष्णतेचे प्रमाण वाढल्याने काही ठिकाणी मान्सून पूर्व पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. (weather update)

Responsive Weather Iframe
तुमच्या भागाचा लाईव्ह हवामान अंदाज

यंदा देशात 96 ते 106 टक्के पाऊस पडणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे यंदा देशात सगळीच धरणे भरण्याची शक्यता आहे. हवामान विभागाचा मान्सूनबाबत दुसरा अंदाज जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्रात मान्सून (Monsoon in Maharashtra) कधी दाखल होतो याची सर्वजण वाट पाहू लागले आहेत. पण त्याच दरम्यान स्कायमेटने (Skymet) भारतीय हवामान विभागाने मान्सून आगमनाबाबत केलेल्या दाव्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे मान्सून खरंच केरळात दाखल झाला आहे की नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

havaman andaj

भारतीय हवामान खात्याने सर्व तपासणी न करता मान्सून दाखल झाल्याची घोषणा केली. एका दिवसाच्या निरीक्षणाद्वारे घोषणा करणं अयोग्य आहे असं खाजगी हवामान अंदाज वर्तक स्कायमेटने म्हटलं आहे. मात्र, आयएमडीने स्कायमेटचा हा दावा फेटाळून लावला आहे.

hawaman andaz today

सोमवारी जारी केलेल्या एका निवेदनात, खाजगी हवामान अंदाज वर्तक संस्था असलेल्या स्कायमेटने म्हटले, आयएमडीने रविवारी केरळ किनारपट्टीवर मान्सून दाखल झाल्याचं म्हटलं. हे सांगताना गेल्या दोन दिवसांपासून वाऱ्याचा वेग आणि ओएलआर यावर आधारित निर्णय घेतला. पण जेव्हा पावसाचा विचार केला जातो तेव्हा सर्वात महत्त्वाचा आणि दृश्यमान याची आकडेवारी दर्शवते की मान्सूनची सुरुवात घोषित करण्यासाठी आवश्यक असलेल्या निकषांची पूर्तता करण्यात आलेली नाही.

लाईव्ह हवामान अंदाज

केरळमध्ये आज 29 मे 2022 रोजी मान्सून सुरू झाल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले. दरम्यान हवामान खात्याकडून काही सूचना देण्यात आल्या आहेत. मान्सून दाखल होण्यापूर्वी पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्याची समुद्रसपाटीपासून  खोली ४.५ किमी पर्यंत असते. दरम्यान हे वाऱ्यांचा वेग वाढून तो 25-35 kmph गेल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.

आग्नेय अरबी समुद्र आणि केरळच्या लगतच्या भागात ढगाळ वातावरणात मोठी वाढ झाली आहे. दरम्यान केरळमध्ये मागच्या 24 तासांमध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाने हजेरी लावली आहे. केरळमध्ये 14 पर्जन्य निरीक्षण केंद्रांपैकी 10 निरीक्षण केंद्रांवर केरळमध्ये मान्सून आल्याचे संकेत दिले आहेत. 10 केंद्रांवर 2.5 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

punjab dakh havaman andaj today

दरम्यान राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान होत आहे. मागच्या काही दिवसांपासूनतापमानात चढ-उतार होताना दिसत आहे. काही प्रमाणात उष्णता वाढली आहे. उद्यापासून (ता. ३०) राज्यात वादळी वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Web Title – Weather Update: Will monsoon come late in Maharashtra? Monsoon arrival date postponed

हे पण वाचा:

नावहवामान अंदाज महाराष्ट्र राज्य
विभागभारतीय हवामान शास्त्र विभाग
पत्ताहवामान विभाग – IMD
दिनांक04 मे 2022
संकलनआजचे हवामान महाराष्ट्र 2022

पंजाब डख हवामान अंदाज Whatsapp Group

मित्रांनो दररोज जिल्हानिहाय हवामान अंदाज मिळवण्यासाठी आणि त्याचबरोबर पंजाब डख हवामान अंदाज व हवामान विभागाचे अपडेट निशुल्क मिळवण्यासाठी इथे क्लिक करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा आणि हि माहिती जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn
Follow us

---Advertisement---

LATEST Post

Close Visit Havaman Andaj

WhatsApp Icon Telegram Icon