Weather Alert: गेले दोन महिने संपूर्ण महाराष्ट्र पावसाने हैराण झाला आहे. सप्टेंबरच्या सुरुवातीपासून मराठवाड्याला मुसळधार पावसाने झोडपले आहे. यामुळे हजारो हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. दरम्यान, राजस्थानमधून परतीचा पाऊस 27 सप्टेंबरपासून सुरू झाला आहे. (Jawad Chakri Vadal Update)
औरंगाबाद आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून परतीचा पाऊस सुरू झाला आहे. विविध जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरूच आहे. महाराष्ट्राच्या काही भागात 10 ऑक्टोबरपर्यंत पावसाची तीव्रता कमी होण्याची चिन्हे आहेत, तथापि, पुढील काही दिवसांत मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये आणखी एक चक्रीवादळ धडकेल, असे प्रसिद्ध हवामानशास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले.
Jawad Chakri Vadal Update
प्रसिद्ध हवामानशास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर यांच्या मते, केरळ किनाऱ्याजवळ सध्या कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. त्याची दिशा पूर्व दिशेला बंगालच्या उपसागराकडे सरकत आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र पुढील पाच ते सहा दिवसात चक्रीवादळात बदलण्याची शक्यता आहे. जर हे कमी दाबाचे क्षेत्र चक्रीवादळात रूपांतरित झाले तर त्याला ‘जवाद’ म्हटले जाईल.
हे पण वाचा:
- Maharashtra Rain Updates : आजपासून तुफान पाऊस!! या जिल्ह्यांतील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा
- Maharashtra Weather : पुणेसह राज्यातील ‘या’ 16 जिल्ह्यांना येलो अलर्ट! जाणून घ्या आज कुठे पाऊस पडणार
- Panjabrao Dakh सांगतायत राज्यामध्ये आता मुसळधार पाऊस केव्हा आणि कोणत्या जिल्ह्यात होणार? पहा पंजाब डख हवामान अंदाज
- Monsoon Rain Forecast: राज्यात काही ठिकाणी मुसळधार, तर विदर्भात सोमवारपासून पावसाला विश्रांती मिळण्याची शक्यता
- Monsoon Update: कोकण, मध्य महाराष्ट्र, पूर्व विदर्भात जोरदार पाऊस जोर धरणार; मराठवाड्यात हलक्या सरीची शक्यता
हे ‘जवाद’ चक्रीवादळ 14 आणि 15 तारखेला तयार होणार आहे. चक्रीवादळ जवाद 16 ऑक्टोबर रोजी आंध्र प्रदेशच्या पूर्व किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे.
Offshore Accident Lawyer In the USA with Complete Guide
Best Motorcycle Accident Lawyer in USA Full Details
चक्रीवादळ आंध्र प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, महाराष्ट्रातील विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, लातूर आणि परभणी येथे तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पुढील आठवड्यात 16 ते 17 ऑक्टोबर दरम्यान पुन्हा पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे.
चक्रीवादळामुळे थंडीचे आगमन उशिरा
कोकण आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्र वगळता उर्वरित महाराष्ट्रात येत्या दोन ते तीन दिवसांत पावसाची पूर्ण माघार होण्याची शक्यता आहे. उत्तरेकडे कडाक्याची थंडी आहे. मात्र जवाद या चक्रीवादळाचा परिणाम म्हणून मराठवाडा आणि महाराष्ट्रातील विदर्भाच्या काही भागात थंडीचे आगमन उशिरा होण्याची शक्यता आहे.
नाव | भारतीय हवामान विभाग यांचा अंदाज |
---|---|
विभाग | प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई – Jawad Chakrivadal Update |
पत्ता | IMD Mumbai व IMD New Delhi |
दिनांक | 10 ऑक्टोबर 2021 |
फेसबुक | दररोज हवामान अंदाजासाठी फेसबुक पेज लाईक करा |
हवामान अंदाज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा | |
संकलन | आजचे हवामान महाराष्ट्र 2021 |
शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अंदाज मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अवश्य जॉईन व्हा. धन्यवाद!