Monsoon Updates: गेल्या आठ दिवसांपासून नैऋत्य मोसमी वाऱ्याच्या स्थितीत हवामान खात्याने कोणताही बदल नोंदवला नाही. आठ दिवसांपासून देशाच नैऋत्य मोसमी वाऱ्याची स्थिती जैसे थे आहे.
हवामान अंदाज. 23 ऑक्टोबर: गेल्या काही दिवसांपासून उत्तर आणि दक्षिण भारतात मान्सूनच्या पावसाने थैमान (Heavy rainfall in india) घातलं आहे. निम्म्याहून अधिक देशातून मान्सून परतला असला तरी बऱ्याच राज्यात मान्सूनचा मुक्काम वाढला (Monsoon in india) आहे.
आणखी काही दिवस दक्षिण भारत आणि ईशान्यकडील राज्यात मान्सूनच्या सरी कोसळणार आहेत. खरंतर, गेल्या आठ दिवसांपासून नैऋत्य मोसमी वाऱ्याच्या स्थितीत हवामान खात्याने कोणताही बदल नोंदवला नाही. आठ दिवसांपासून देशाच नैऋत्य मोसमी वाऱ्याची स्थिती जैसे थे आहे. त्यामुळे पुढील आणखी काही दिवस देशात मान्सूनच्या सरी कोसळणार आहेत.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या आठवड्यात म्हणजेच 26 ऑक्टोबर रोजी संपूर्ण देशातून मान्सून वापसी (Monsoon withdrawn) होणार आहे. 1975 नंतर देशात पहिल्यांच इतके दिवस मान्सून थांबला आहे.
वायव्य भारतातून मान्सूनने निरोप घेतल्यानंतरही, काही राज्यात अद्याप नैऋत्य मोसमी वारे सक्रिय आहेत. यावर्षी 6 ऑक्टोबर रोजी राजस्थानमधून मान्सूनने परतीच्या प्रवासाला सुरुवात केली होती.
पण दरम्यान अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला होता. याचा दुहेरी प्रभाव मान्सूनवर पडला आहे. त्यामुळे देशात मान्सून रखडला आहे. सध्या महाराष्ट्रात सिंधुदुर्ग काही भाग आणि दक्षिण-ईशान्य भारतात मान्सून अडकला आहे. गेल्या आठ दिवसांपासून मान्सूनच्या वाऱ्याची हीच स्थिती कायम आहे. त्यामुळे देशात आणखी काही मान्सूनचा मुक्काम वाढणार आहे.PROMOTED CONTENTBy
हेही वाचा-
- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पंजाबराव डख यांचा २१ जून २०२५ पर्यंतचा हवामान अंदाज; ‘या’ जिल्ह्यांत जोरदार पाऊस | Punjab Dakh Havaman Andaj
- आजचे हवामान | या २२ जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात मुसळधार पाऊस
- महाराष्ट्रात मान्सूनने जोर धरला, अनेक भागांत ढगफुटीसदृश्य पाऊस, 2 जिल्ह्यांना रेड अलर्ट | Monsoon 2025
- Monsoon Update: मे महिन्यात कसे असेल हवामान, कुठे आहे पावसाची शक्यता? पहा हवामान विभागाचा अंदाज
- पुढील 4 दिवस या जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा 🌦️ 29 एप्रिल ते 2 मे हवामान अंदाज | Monsoon 2025
दुसरीकडे, महाराष्ट्रात मात्र पावसाने पूर्णपणे उघडीप घेतली आहे. गेल्या आठवड्यापासून राज्यात कुठेही पावसाचा इशारा देण्यात आला नाही. तसेच आजपासून पुढील पाच दिवस राज्यात कोरड्या हवामानाची शक्यता आहे.
दरम्यान, काही ठिकाणी तुरळक हलक्या पावसाच्या सरी कोसळू शकतात. पण याची शक्यता खूपच कमी आहे. तर पुण्यात तीन दिवसानंतर हवामान खात्याने ढगाळ हवामानाची नोंद केली आहे. येथे कमाल 32.2 आणि किमान 17 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
नाव | भारतीय हवामान विभाग यांचा अंदाज |
---|---|
विभाग | प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई |
पत्ता | IMD Mumbai व IMD New Delhi |
दिनांक | 23 ऑक्टोबर 2021 |
फेसबुक | दररोज हवामान अंदाजासाठी फेसबुक पेज लाईक करा |
हवामान अंदाज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा | |
संकलन | आजचे हवामान महाराष्ट्र 2021 |
शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अंदाज मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटचे नोटिफिकेशन सुरू करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अवश्य जॉईन व्हा. धन्यवाद!