Monsoon Latest Update: गेले काही दिवस दक्षिण भारत आणि ईशान्य भारतात नैऋत्य मोसमी वारे अडकून पडल्यानंतर, अखेर संपूर्ण देशातून मान्सूनने माघार घेतल्याची घोषणा भारतीय हवामान शास्त्र विभागाने केली आहे.
हवामान अंदाज, 25 ऑक्टोबर: गेले काही दिवस दक्षिण भारत आणि ईशान्य भारतात नैऋत्य मोसमी वारे अडकून पडल्यानंतर, अखेर संपूर्ण देशातून मान्सूनने माघार घेतल्याची घोषणा भारतीय हवामान शास्त्र विभागाने केली आहे. आज 25 ऑक्टोबर रोजी संपूर्ण देशातून मान्सून परतला असल्याची अधिकृत माहिती हवामान खात्याचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून दिली आहे. गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच मान्सून इतके दिवस भारतात सक्रिय राहिला आहे.
यंदा मान्सून सामान्य राहणार असून सरासरीपेक्षा अधिक पाऊस कोसळेल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली होती. त्यानुसार राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसानं झोडपून काढलं आहे. 6 ऑक्टोबरपासून वायव्य भारतातून सुरू झालेल्य पावसाने राज्यात थैमान घातलं आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य आणि उत्तर महाराष्ट्राला परतीच्या पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. यामुळे अकोला, नाशिक परिसरात पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. यामध्ये शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं आहे.
हेही वाचा-
- Maharashtra Rain Updates : आजपासून तुफान पाऊस!! या जिल्ह्यांतील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा
- Maharashtra Weather : पुणेसह राज्यातील ‘या’ 16 जिल्ह्यांना येलो अलर्ट! जाणून घ्या आज कुठे पाऊस पडणार
- Panjabrao Dakh सांगतायत राज्यामध्ये आता मुसळधार पाऊस केव्हा आणि कोणत्या जिल्ह्यात होणार? पहा पंजाब डख हवामान अंदाज
- Monsoon Rain Forecast: राज्यात काही ठिकाणी मुसळधार, तर विदर्भात सोमवारपासून पावसाला विश्रांती मिळण्याची शक्यता
- Monsoon Update: कोकण, मध्य महाराष्ट्र, पूर्व विदर्भात जोरदार पाऊस जोर धरणार; मराठवाड्यात हलक्या सरीची शक्यता
दुसरीकडे, गेल्या दोन आठवड्यापासून राज्यात कोरड्या हवामानाची नोंद करण्यात आली आहे. हवामान खात्याने येत्या पाच दिवसांसाठी राज्यात कोणताही इशारा दिला नाही. पुढील पाचही दिवस राज्यात कोरडं हवामान राहण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यात मात्र अनेक ठिकाणी ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यात तापमानाचा पारा देखील घसरला आहे. रविवारी शहरात 16.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर लोहगाव येथे 17.4 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
नाव | भारतीय हवामान विभाग यांचा अंदाज |
---|---|
विभाग | प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई |
पत्ता | IMD Mumbai व IMD New Delhi |
दिनांक | 26 ऑक्टोबर 2021 |
फेसबुक | दररोज हवामान अंदाजासाठी फेसबुक पेज लाईक करा |
हवामान अंदाज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा | |
संकलन | आजचे हवामान महाराष्ट्र 2021 |
शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अंदाज मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटचे नोटिफिकेशन सुरू करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अवश्य जॉईन व्हा. धन्यवाद!