Maharashtra Rain Updates : आजपासून तुफान पाऊस!! या जिल्ह्यांतील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा

मुंबई, दि. 13 ऑगस्ट 2025: गेल्या काही दिवसांपासून कमी झालेला पाऊस आता पुन्हा एकदा जोर धरणार आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने महाराष्ट्रात पुढील पाच दिवस पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने याबाबत अलर्ट जारी केला आहे. पूर्व विदर्भात ऑरेंज अलर्ट, तर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किमी

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पूर्व विदर्भातील चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ आणि गडचिरोली येथे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर वगळता इतर सर्व जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज आहे. हिंगोली, नांदेड, वाशीम, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांत सोसाट्याच्या वाऱ्यासह आणि विजांच्या गडगडाटात पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. या काळात ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे, सातारा, अहिल्यानगर, सोलापूर आणि कोल्हापूर येथेही पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.

मुंबईत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता

मुंबईत आज दिवसभर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. यामुळे लोकल ट्रेन सेवेवर परिणाम होण्याची भीती आहे, ज्यामुळे मुंबईकरांचा प्रवास खोळंबण्याची शक्यता आहे. ठाणे आणि पालघर येथेही पावसाची अशीच परिस्थिती राहील. त्यामुळे या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

ऑरेंज अलर्ट असलेले जिल्हे:

यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली

येलो अलर्ट असलेले जिल्हे:

कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नांदेड, वर्धा, वाशीम, हिंगोली, नागपूर, गोंदिया, पुणे, पालघर, सातारा, ठाणे, मुंबई, अहिल्यानगर, लातूर, बीड, सोलापूर, धाराशिव, अमरावती, परभणी, बुलढाणा, अकोला

नागरिकांना पावसाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी बाळगण्याचे आणि आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे. महाराष्ट्र पाऊस अपडेट्स सतत लक्षात ठेवा आणि सुरक्षित रहा!

Close Visit Havaman Andaj

Scroll to Top