25 ऑगस्ट पासून या जिल्ह्यात होणार पावसाला सुरुवात तर इतक्या जिल्ह्यात मुसळधार । Panjab Dakh Hawaman Andaj

नमस्कार 25 ऑगस्ट पासून या जिल्ह्यात होणार पावसाला सुरुवात तर पुढील दहा दिवस असे असेल वातावरण. हवामान अभ्यासक पंजाब डख (Panjab Dakh Weather Report) यांचा अंदाज पाहूयात याविषयी सविस्तर बातमी.

29 ऑगस्ट ते ३ सप्टेंबर या तारखेत राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज असून, दि. 21 ते 23 ऑगस्ट विदर्भ मराठवाड्यात पुढील दोन दिवस पावसाची शक्‍यता हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी व्यक्त केली आहे.

तर 24 तारखेपासून सूर्यदर्शन होईल व या दरम्यान शेतकऱ्यांनी मुगाची काढणी पुढील पाच दिवसात करून घ्यावी कारण येत्या 29 तारखेपासून पुन्हा राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात पावसाला सुरुवात होणार आहे.

या दरम्यान मराठवाड्यातील नांदेड परभणी औरंगाबाद जालना लातूर उस्मानाबाद बीड तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे सोलापूर सांगली नगर नाशिक तर विदर्भातील अकोला अमरावती यवतमाळ वाशिम आणि उत्तर महाराष्ट्रातील धुळे जळगाव या जिल्ह्यात 29 ऑगस्टपासून ते दोन सप्टेंबर या दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज पंजाबराव यांनी वर्तवला आहे.

तसेच या भागातील धरण क्षेत्रात पाण्याची आवक वाढण्याची शक्‍यता सुद्धा हवामान अभ्यासक Panjab Dakh यांच्याकडून करण्यात आले आहे.

हे पण वाचा :

अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ पहा :

शेतकरी मित्रांनो, तुम्हाला Panjab Dakh Weather Report (पंजाब डख हवामान अंदाज) बद्दल हा लेख आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांना माहिती शेयर करा. धन्यवाद.

Close Visit Havaman Andaj

Scroll to Top