Weather Update Winter: गेल्या काही दिवसांपासून देशासह राज्याच्या वातावरणात अचानक बदल झाला आहे. पुढील दोन दिवसांत पुन्हा थंडीची लाट येण्याची शक्यता भारतीय हवामान खात्यानं (IMD) वर्तवली आहे. मागील काही दिवसांपासून देशातील अनेक राज्यांमध्ये थंडीचा तडाखा वाढला आहे.
दरम्यान, आता पुन्हा एकदा येत्या २४ तासांत थंडी वाढण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्यानं दिली आहे. (Cold Wave) देशातील किमान तापमानात जास्त बदल नसला तरी नंतर हळूहळू हा बदल होऊन थंडी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील २४ तासांत मध्य भारतात किमान तापमानात जास्त बदल होणार नाही मात्र नंतर हळूहळू हा बदल वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील 24 तासांत थंडीची तीव्रता वाढणार आहे. याचा परिणाम देशातील मध्य प्रदेश, (MP) विदर्भ व छत्तीसगड या काही ठराविक भागात जाणवणार असून कालांतराने ही तीव्रता कमी होईल.
त्यामुळे पुढील २४ तासांत महाराष्ट्रातील (Maharashtra) विदर्भ, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातील काही भागांत थंडीच्या लाटेची शक्यता असून तिची तीव्रता हळूहळू कमी होणार असल्याचे स्पष्ट केलं आहे.
सौजन्य व साभार – सकाळ
इतर हवामान अंदाज –
- Maharashtra Weather Forecast : राज्यात पुढचे ७२ तास मुसळधार पाऊस; मुंबई, पुण्यासह ८ जिल्ह्यांना अलर्ट जारी
- Weather Update : राज्यात मुसळधार पावसाचा इशारा! कुठे ऑरेंज तर कुठे यलो अलर्ट; वाचा हवामान विभागाचा अंदाज
- Maharashtra Rain Update : येत्या चार ते पाच दिवसांत राज्यात ‘या’ जिल्ह्यात मुसळधार; वाचा हवामान विभागाचा अंदाज
- IMD Rain Alert : राज्यासाठी पुढील चार दिवस महत्त्वाचे; ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार मेघगर्जनेसह पाऊस, IMD कडून अलर्ट जारी
- Maharashtra Rain : महाराष्ट्रात पुन्हा पावसाच्या मुसळधारा? पहा आजचा नवीन हवामान अंदाज
नाव | भारतीय हवामान विभाग यांचा अंदाज |
---|---|
विभाग | प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई |
पत्ता | IMD Mumbai व IMD New Delhi |
दिनांक | 28 जानेवारी 2022 |
फेसबुक | दररोज हवामान अंदाजासाठी फेसबुक पेज लाईक करा |
हवामान अंदाज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा | |
संकलन | आजचे हवामान महाराष्ट्र 2022 |
पंजाब डख हवामान अंदाज Whatsapp Group
शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अंदाज मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अवश्य जॉईन व्हा. धन्यवाद!