आजचा हवामानाचा अंदाज मित्रांनो आजच्या पोस्ट मध्ये आपण जाणून घेणार आहोत की दिनांक 2 व 3 मे ला राज्यात कुठे कुठे पावसाची शक्यता आहे.
राज्यात बहुतांश ठिकाणी कमी दाबाचा पट्टा हा निर्माण झालेला आहे आणि त्याच मुळे राज्य आपल्याला अवकाळी पावसाचा विजांचा कडकडाट व गारपिटीचा अंदाज निर्माण होताना दिसून येत आहे तर मित्रांनो आज आपल्याला विविध विभागांमध्ये कशा प्रकारचा हवामान राहील हे आपण सविस्तरपणे पाहतोय
काल आपल्याला महाराष्ट्राच्या बऱ्याच भागांमध्ये महाराष्ट्रदिनी जोरदार पावसाचा तडाखा बघायला मिळाला त्याचबरोबर गारपीट सुद्धा राज्याच्या बहुतांश भागांमध्ये झालेल्या ज्यामध्ये कोकण मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र खानदेश आणि विदर्भाचा काही भाग या ठिकाणी पाऊस झालेला आहे आणि अशाच प्रकारचं वातावरण पुढील दोन ते तीन दिवस राहण्याचा अंदाज हा निर्माण होतो तसेच घाटमाथ्यावरील काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस हजेरी लावताना बघायला मिळेल आणि काही परिसरात गारपीटीची सुद्धा शक्यता आहे
अनुक्रमणिका
Toggleहवामान अंदाज कोकण विभाग
सुरुवात करूया कोकण विभागापासून कोकण विभागामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता ही दोन तारखेला निर्माण होत आहे तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची सुद्धा शक्यता राहील.
मध्य महाराष्ट्र हवामानाचा अंदाज
आता जाणून घ्या मध्य महाराष्ट्राचा हवामान अंदाज तर मध्य महाराष्ट्र मध्ये काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आणि तुरळक ठिकाणी विजांचा कडकडात मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह गारा पडण्याची शक्यता राहील
मराठवाडा पावसाचा अंदाज
आता जाणून घ्या मराठवाड्याचा हवामान अंदाज र मराठवाडा विभागामध्ये काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा आणि गारपीट होण्याची शक्यता हे आज निर्माण होत आहे
हे पण वाचा
हवामानाचा अंदाज संपूर्ण विदर्भ
त्यानंतर विदर्भाचा जर हवामान अंदाज बघितला तर विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज असून काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आज निर्माण होत आहे
तर अशाप्रकारे विविध विभागांमध्ये दिनांक दोन व तीन तारखेचा तारखेचा पावसाचा अंदाज निर्माण होत आहे
अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ पहा.