IMD Rain Alert : देशात बदलत असलेल्या हवामानावर भारतीय हवामान विभागाचा बारीक लक्ष आहे. सध्या स्थितीमध्ये काही राज्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे तर काही राज्यात आता थंडी सुरू झाली आहे.
यातच पुन्हा एकदा हवामान विभागाने महाराष्ट्रसह 8 राज्यांमध्ये पावसाचा इशारा दिला आहे तर 3 राज्यात थंडीसाठी यलो अलर्ट जरी केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रसह केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, ओडिशा आणि आंध्र प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो तर हा पाऊस 22 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार असल्याची शक्यता आहे.
बिहारमध्ये शुक्रवार सर्वात थंड | Cold in Bihar
डोंगराळ भागात वाहणाऱ्या बर्फाळ वाऱ्याच्या प्रभावामुळे राजगीरमध्ये पश्चिमेचे वारे वाहत होते. पश्चिमेकडील वाऱ्याच्या प्रभावामुळे तापमानात घसरण सुरूच आहे. ताशी 12 ते 15 किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. याशिवाय राज्याच्या दक्षिण भागातही थंडी जाणवत आहे. धुक्याचा परिणाम राज्याच्या उत्तर भागात दिसून येत आहे.
हवामान केंद्राच्या माहितीनुसार, शुक्रवारी राज्यातील 18 जिल्ह्यांमध्ये किमान तापमानात घट झाली आहे. बिहारमध्ये गया येथे शुक्रवारी सर्वात जास्त थंडीची नोंद झाली आहे. किमान तापमानात 1.8अंश सेल्सिअसची घट झाली आहे.
तापमान 6.2 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे. याशिवाय बेगुसरायमध्ये 9.7 डिग्री सेल्सिअस, औरंगाबादमध्ये 8.1 डिग्री सेल्सिअस, पाटणामध्ये 9.1 डिग्री सेल्सियस, सिवानमध्ये 9 डिग्री सेल्सिअस किमान तापमान नोंदवण्यात आले आहे.
हे पण वाचा
या राज्यांत येलो अलर्ट | Yellow Alert for This States
हिमाचल, राजस्थान, पंजाब आणि उत्तर उत्तर प्रदेशमध्ये थंडीच्या लाटेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय बिहार आणि झारखंडमध्येही जोरदार वाऱ्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आसाम मेघालय मणिपूरसह अनेक राज्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. याशिवाय तापमानात घसरण सुरूच राहणार आहे.
हे पण वाचा –
- राज्यात पुढील २ दिवस मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ भागांत धो-धो बरसणार, कसं असेल हवामान?
- Panjabrao Dakh Havaman Andaj | राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार; या जिल्ह्यांमध्ये जोरदार बरसणार
- Aaj che Havaman (आजचे हवामान): राज्यात पावसाचा जोर वाढणार! ‘या’ ठिकाणी होणार मुसळधार, IMD कडून यलो अलर्ट
- Maharashtra Weather August 2024 । महाराष्ट्रातील या 6 जिल्ह्यांमध्ये ‘यलो अलर्ट’ ; विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा
- IMD चा उद्याचा जिल्हानिहाय हवामान अंदाज; या १ १ जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज । Monsoon Alert Maharashtra