हवामान ग्रुप जॉईन करा
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग
. .
. .
Trending Now

Rain Update : औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत पाऊस, मोठे नुकसान

औरंगाबाद : गत दोन दिवसांपासून मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड या तीनही जिल्ह्यांतील काही ठिकाणी अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) हजेरी लावली आहे. या पावसामुळे वेचणीला आलेला कापूस (Cotton Picking) भिजला असून ढगाळ व प्रतिकूल वातावरणामुळे (Cloudy Weather) गहू, कांदा, तूर उत्पादक तसेच ताणावर असलेल्या फळबागांचे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यात बुधवारी रात्री सावलदबारा, बनोटी, सोयगाव, जरंडी, हातनूर, फुलंब्री, वडोद बाजार, आळंद, पीरबावडा, बाबरा, ढोलकी टाकळी, राजेराय, कायगाव, विहामांडवा, चित्ते पिंपळगाव, निपाणी, आडगाव, भालगाव, आपतगाव, पाचोड, एकोड, लोहगाव, नागद परिसरात काही ठिकाणी रिमझिम, तर काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला कायगाव, अमळनेर वस्ती (ता. गंगापूर) परिसरात बुधवारी (ता. १४) रात्री वादळी वाऱ्यासह धो धो आलेल्या अवकाळी पावसाने ऊसतोड कामगारांच्या पाचटाच्या कोप्या भिजून त्यांचे हाल केले. तर हरभरा, गहू, तूर आणि कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.

हे पण वाचा -   IMD Report 11 July 2023 : महाराष्ट्रात आज अनेक ठिकाणी तुरळक आणि काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

बुधवारी (ता. १४) अनेक भागांत दिवसभर ढगाळ वातावरण होते. सायंकाळी पावसाचे ढग दाटून आले. रात्री सव्वादहाच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अचानक धो धो पाऊस बरसला. गोदावरी नदी काठच्या अमळनेर वस्ती, जुने कायगाव, लखमापूर आदी गंगथंडी भागात अर्धा तासाच्या वर पावसाच्या सरी कोसळल्या.

या पावसाने सर्वत्र शेतशिवार ओलेचिंब झाले होते. अचानक आलेल्या पावसाने ऊसतोड कामगारांचे मोठे हाल केले. दिवसभर ऊसतोड करून पाचटाच्या कोप्यात झोपी गेलेले ऊसतोड कामगार व त्यांची लहान चिमुकली मुले अचानक आलेल्या पावसात भिजली. कोप्यावर ताडपत्री पाचट टाकण्यासाठी अनेकांची रात्रीच्या अंधारात धावपळ उडाली.

तूर सोंगणीला आलेले शेतशिवार ओलेचिंब झाले. अनेक ठिकाणी वेचणीस आलेला कापूस भिजला. हरभरा, ज्वारी पिकांसाठी पाऊस पोषक असला, तरी कांदा, गहू या रब्बी पिकांसाठी आणि भाजीपाला पिकांसाठी नुकसानकारक आहे. आणखी काही दिवस ढगाळ वातावरण आणि पावसाचे संकेत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

हे पण वाचा -   Manikrao Khule Havaman Andaj : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक! अवकाळी वातावरणापासून मिळणार सुटका, वाचा आजचे व उद्याचा हवामान अंदाज 

अवकाळी पावसाने जामगाव, कायगाव, सोलेगाव परिसरातील वीटभट्टीचालक आणि कामगार लोकांची दैना, अवकळा केली. तर कायगाव, अमळनेर, लखमापूर, जामगाव, भिवधानोरा, अगरवाडगाव आदी भागांत ऊसतोड करण्यासाठी आलेल्या कामगारांची फजिती केली आहे. बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील काही मंडळांत रिमझिम पाऊस झाला. तर जालना जिल्ह्यातील सुखापुरी परिसरात १५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

शेअर नक्की करा:
Close Visit Havaman Andaj