Weather Update | राज्यात थंडीचा कडाका वाढणार?, जाणून घ्या नवीन वर्षाचा हवामान अंदाज - हवामान अंदाज महाराष्ट्र 2023 - शेतकरी सेवार्थ.!
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग
. .
. .
Trending

Weather Update | राज्यात थंडीचा कडाका वाढणार?, जाणून घ्या नवीन वर्षाचा हवामान अंदाज

Weather Update | टीम हवामान अंदाज देशामध्ये दिवसेंदिवस वातावरणात (Weather) बदल होत चालला आहे. कुठे थंडीचा (Cold) कडाका जाणवत आहे, तर कुठे ढगाळ वातावरण तयार झाले आहे. तर काही ठिकाणी पाऊस (Rain) पडल्याचे समोर आले आहे. देशामध्ये अनेक ठिकाणी थंडीचा कडाका वाढत चालला आहे.

तर, उत्तर भारतामध्ये तापमानाचा पारा दिवसेंदिवस घसरत चालला आहे. त्याचबरोबर देशाची राजधानी दिल्लीमध्ये देखील थंडीत चांगलीच वाढ झाली आहे. तर, दुसरीकडे राज्यातही थंडीचा कहर चांगलाच वाढला आहे. राज्यामध्ये अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 15 ते 20 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आला आहे.

उत्तर भारतामध्ये थंडीचा पारा आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. हिमालयातून वाहणाऱ्या बर्फाळ वाऱ्यांमुळे भारतातील मैदानी भागात किमान तापमानात घट होण्याची शक्यता देखील हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. दरम्यान, राजधानी दिल्लीमध्ये तापमानाचा पारा दहा अंश सेल्सिअस पर्यंत घसरला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील चार ते पाच दिवस उत्तर भारतामध्ये थंडी वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर काही भागांमध्ये दाट धुके पडण्याची शक्यता देखील हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. पंजाब, हरियाणा, उत्तर राजस्थान, दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश या भागांमध्ये पुढील 24 तास दाट धुके पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

राज्यामध्ये देखील अनेक जिल्ह्यात तापमानात घसरण झाली आहे. दरम्यान, थंडी वाढल्यामुळे जागोजागी शेकोट्या पेटलेल्या दिसत आहे. राज्यात विदर्भ, मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील थंडीचा कडाका वाढत आहे. त्याचबरोबर पुणे, कोल्हापूर या जिल्ह्यात देखील थंडी वाढली आहे. ही वाढती थंडी रब्बी पिकांसाठी चांगली असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या वाढत्या थंडीचा फायदा राज्यातील शेतकऱ्याला होऊ शकतो.

महत्वाच्या बातम्या

शेअर नक्की करा: