हवामान ग्रुप जॉईन करा
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग

Weather Update: राज्यात जोरदार पावसाचा इशारा ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी, रब्बीसह फळबागांना धोका

Weather Alert : नमस्कार हवामान अंदाज महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये ऐन हिवाळ्यात पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावलेले आहे आणि यामुळे राज्यांमध्ये शेतकरी चिंतेत आले असून रब्बी सह फळबागांना सुद्धा धोका निर्माण झालेला आहे तर आजच्या या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत आजचा आणि पुढील 24 ते 48 तासांचा हवामान अंदाज आणि त्यात सोबत शेतकऱ्यांना पावसाबाबत देण्यात आलेला हवामान विभागाचा नेमका इशारा काय आहे.

ऐन हिवाळ्यात राज्यात पावसाने हजेरी लावली आहे. बुधवारी (1) राज्यातल्या बऱ्याच भागात पावसाने हजेरी लावली. पुण्यामध्ये 75 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर आज देखील राज्यातल्या अनेक भागात पाऊस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

आज राज्यातील कोकण , मध्य महाराष्ट्रातील काही भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार या भागात ऑरेंज अलर्ट तर मुंबई, ठाणे, पुणे व इतर काही ठिकाणी कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाडा मध्ये हवामान खात्याकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे.

हे पण वाचा -   Maharashtra Monsoon Update: महाराष्ट्राच्या ‘या’ भागात पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज काय? जाणून घ्या…

पुढील 3-4 तासात या भागात पाऊस

हवामान खात्याने आज एकूण 17 जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी केला आहे. यामध्ये पालघर, नाशिक, धुळे आणि नंदुरबार या चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. संबंधित जिल्ह्यात बहुतांशी ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्‍यता आहे.तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाजही हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

यासोबतच मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, जळगाव, बीड आणि उस्मानाबाद या तेरा जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. संबंधित जिल्ह्यांमध्ये आज सकाळपासूनच ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील तीन ते चार तासांत या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी लागण्याची शक्‍यता आहे.

हे पण वाचा -   Maharashtra Weather Forecast :राज्यात ‘इथे’ अतिवृष्टीचा इशारा तर ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट, पहा आजचा हवामान अंदाज

‘जोवाड’ चक्रीवादळाचा इशारा

एकीकडे अवकाळी पाऊस कोसळतोय आणि दुसरीकडे हवामान खात्यानं आता चक्रीवादळाचा इशारा दिला आहे. आधीच ऐन थंडीत महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पाऊस पडत आहे. अशातच आता ‘जोवाड’ चक्रीवादळ (Cyclone Jovad) येण्याची शक्यता आहे.

वादळ आणि हवामानातील बदलांमुळे राज्यातील अनेक भागांमध्ये आज आणि उद्या मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या समुद्र किनारपट्टीजवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने चक्रीवादळाची स्थिती निर्माण होत आहे. ही स्थिती 3 डिसेंबरपर्यंत अधिक बळकट होऊन त्याचे रुपांतर चक्रीवादळात होईल आणि ते उत्तर-पश्चिम दिशेला पुढे सरकेल, असाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

हे पण वाचा -   In next 24 hours, heavy rain will occur to this area in Maharashtra Weather Forecast

शेतकरी चिंतेत

ऐन हिवाळ्यात राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसानं हजेरी लावलीय. या अवकाळी पावसाचा ग्रामीण भागाला मोठा फटका बसलाय. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, नंदुरबार जिल्ह्यात शेतपिकं, फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. तर, कांदा, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याला या पावसानं धडकीच भरलीये . सातारा शहर आणि महाबळेश्वरमध्येही अवकाळी पावसानं हजेरी लावलीय.

हे पण वाचा –

त्यामुळे स्ट्रॉबेरीचं पीक धोक्यात आलं. तिकडे कोकणातील रत्नागिरीतल्या चिपळूण, गुहागर, खेड, दापोलीतही सरी बरसल्यात. त्यामुळे आंबा पीक संकटात सापडलंय. राज्यात पुढील दोन ते तीन दिवस पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळं शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत सापडला आहे.

सौजन्य व साभार – हॅलो कृषी ऑनलाईन

नावभारतीय हवामान विभाग यांचा अंदाज
विभागप्रादेशिक हवामान केंद्र मुंबई – Jawad Chakrivadal Update
पत्ताIMD Mumbai व IMD New Delhi
दिनांक2 डिसेंबर 2021
फेसबुकदररोज हवामान अंदाजासाठी फेसबुक पेज लाईक करा
WhatsAppहवामान अंदाज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
संकलनआजचे हवामान महाराष्ट्र 2021

शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अंदाज मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अवश्य जॉईन व्हा. धन्यवाद!

Styled Responsive Table
प्रधानमंत्री पीक विमा योजना महत्वाचे लेख
Arrow Icon₹२००० चा पुढील हफ्ता या दिवशी येणार Arrow Iconपीएम किसान न्यूज
Arrow Iconनोंदणी क्रमांक शोधा Arrow Iconई-केवायसी करा
Arrow Iconऑनलाइन दुरुस्ती करा Arrow Iconनवीन शेतकऱ्यांची नोंदणी करा
Arrow Iconलाभार्थ्यांची यादी पहा Arrow Iconहेल्पलाइन क्रमांक
Arrow Iconआधारवरून पीएम किसान स्टेटस तपासा Arrow Iconआधार वरून नाव दुरुस्ती करा
Arrow Iconपैसे परत करा Arrow Iconअपात्र शेतकऱ्यांची यादी पहा
Arrow Iconपीएम किसान पात्रता जाणून घ्या Arrow Iconऐच्छिक आत्मसमर्पण
Close Visit Havaman Andaj