हवामान ग्रुप जॉईन करा
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग
. .
. .
Trending Now

cyclone Jawad : आसमानी संकट! आता येणार ‘जोवाड’ चक्रीवादळ? हवामान खात्याचा राज्यांना इशारा

हवामान खात्याने आता चक्रीवादळाचा इशारा दिला आहे. आधीच ऐन थंडीत महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पाऊस पडतोय. अशातच आता ‘जोवाड’ चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे. वादळ आणि हवामानातील बदलांमुळे अनेक राज्यांमध्ये पाऊस पडणार आहे.

Jowad Chakrivadal Live Updates in Marathi

Cyclon Jowad : आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या समुद्र किनारपट्टीजवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने चक्रीवादळाची स्थिती निर्माण होत आहे. ही स्थिती ३ डिसेंबरपर्यंत अधिक बळकट होऊन त्याचे रुपांतर चक्रीवादळात होईल आणि ते उत्तर-पश्चिम दिशेला पुढे सरकेल. ४ डिसेंबरला सकाळी आंध्र प्रदेशच्या उत्तरेला आणि ओडिशाच्या किनारपट्टी भागाला धडकेल.

हे पण वाचा -   Skymet Monsoon Forecast 2022 : यंदा मान्सून 'सामान्य', सरासरीच्या 98 टक्के पाऊस : स्कायमेट

या चक्रीवादळाचे नाव ‘जोवाड’ असे ठेवण्यात आले आहे. दुसरीकडे, तर, वायव्य आणि मध्य भारताच्या लगतच्या भागात वेस्टर्न डिस्टर्बन्स तयार झाले आहे. यामुळे हवामान बदलणार असून २ डिसेंबरपर्यंत देशातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज आहे.

चक्रीवादळ ४ डिसेंबरला आंध्रच्या किनारपट्टीला धडकणार

अंदमानच्या समुद्रात मध्य भागी कमी तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र बुधवारपर्यंत पश्चिम-उत्तर आणि पश्चिमेकडे पुढे सरकेल. बंगालच्या उपसागरात एका चक्रीवादळात त्याचे रुपांतर होईल. हे वादळ ४ डिसेंबरला आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टीला धडकेल. यामुळे ओडिशासह पश्चिम बंगालच्या किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडेल.

आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. ईशान्येतील राज्यांमध्येही ५ ते ६ डिसेंबरदरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

इतर हवामान अंदाज वाचा –

हे पण वाचा -   India Meteorological Department : पुढील ३-४ दिवस होणार मेघगर्जनेसह पाऊस तर या २५ जिल्ह्यांना यलो अलर्ट

अरबी समुद्रातही चक्रावाताची स्थिती आहे. यामुळे येत्या २४ तासांत आरबी समुद्रावर कमी दबावाचा पट्टा तयार होत आहे. यामुळे गुजरातच्या काही भागांमध्ये २ डिसेंबरला मुसळधार पावसाचा अंदाज आहे. यामुळे हवामान विभागाने मच्छिमारांना समुद्रत न जाण्याचा सल्ला दिला आहे. तसंच शेतकऱ्यांनी कापलेले पिक सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

गुजरातमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट

गुजरातच्या बडोदा, नर्मदा, बनासकांठा, साबरकांठा, छोटा उदयपूर, भरूच, तापी, अमरेली, अरावली, दाहोद, महिसागर आणि भावनगर जिल्ह्यांत अनेक ठिकाणी बुधवारी आणि गुरुवारी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

महाराष्ट्र, राजस्थान, हिमाचल प्रदेशात कसे असेल हवामान?

येत्या २४ तासांच अंदमान आणि निकोबार द्वीप समूहांमध्ये मुसळधार पाऊस पडेल. तसंच केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यातील काही भागांमध्ये तुरळक ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, असे हवामान विभागाने म्हटले आहे.

हे पण वाचा -   आजचे हवामान: या आठवड्यात इथे सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज । Hawaman Andaz

हवामानातील बदलांमुळे गुजरात आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात वेगवान वारे आणि समुद्रात उंच लाटा उसळणार आहे. यामुळे हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. ४० ते ५० किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे.

सौजन्य – महाराष्ट्र टाइम्स

नावभारतीय हवामान विभाग यांचा अंदाज
विभागप्रादेशिक हवामान केंद्र मुंबई – Jawad Chakrivadal Update
पत्ताIMD New Delhi
दिनांक3 डिसेंबर 2021
फेसबुकदररोज हवामान अंदाजासाठी फेसबुक पेज लाईक करा
WhatsAppहवामान अंदाज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
संकलनआजचे हवामान महाराष्ट्र 2021

शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अंदाज मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अवश्य जॉईन व्हा. धन्यवाद!

शेअर नक्की करा:
Close Visit Havaman Andaj