नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आजचे हवामान अंदाज महाराष्ट्र मध्ये. महाराष्ट्रात जुलै महिन्याच्या या तारखेपासून पाऊस पुन्हा सक्रिय होण्याचे संकेत देण्यात आले आहेत. महाराष्ट्र या तारखेपासून मुसळधार पावसाला होणार सुरुवात. जाणून घेऊया काय आहे यासंबंधीची सविस्तर माहिती.
अनुक्रमणिका
Toggleआजचे हवामान अंदाज 2021 live
सद्यस्थितीत पश्चिम अरबी समुद्र आणि त्याच्या जवळपासच्या परिसरावर तसेच दक्षिण मुंबईच्या किनारपट्टीवर एक चक्राकार वाऱ्यांची स्थिती पाहायला मिळत आहे. पण ही चक्राकार वाऱ्यांची स्थिती अगदीच कमकुवत असल्याने महाराष्ट्रात सध्या पावसाला पोषक वातावरण नाही.
आजचा हवामान अंदाज
यामुळे राज्यात अनेक ठिकाणी उन्हाचा कडाका आणि उकाड्यात वाढ होताना पाहायला मिळत आहे. दरम्यान उत्तर भारतात आहे पुढे सरकण्यासाठी पोषक वातावरण नसल्याने मान्सून चा पुढचा प्रवास लांबला आहे.
जवळपास पंधरा दिवसापासून अजूनही मान्सून आहे तिथेच असून फारशी प्रगती केलेली दिसत नाही, पण लवकरच पुढे सरकण्यासाठी पोषक वातावरण तयार होऊन मान्सून आगे कूच करेल, अशी माहिती हवामान विभागाकडून येत आहे.
उद्याचा हवामान अंदाज
राज्यात दोन दिवसांपासून पावसाने चांगली उघडीप दिली आहे. पावसाचा जोर चांगलाच मंदावला असला तरी काही जिल्ह्यांमध्ये ढग दाटून येत आहेत मात्र पाऊस पडत नाही. विश्रांती घेणारा पाऊस लवकरच महाराष्ट्रात पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
आजचे हवामान पावसाचे 2021
तोपर्यंत विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाच्या सरींची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे.
हे पण वाचा
हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होण्याचे संकेत असून नऊ जुलै पासून महाराष्ट्रात मुसळधार पावसाला सुरुवात होईल.
तर मित्रांनो हि होती राज्यात परत पावसाळा सुरुवात कधीपासून होईल या बद्दलची महत्वाची अपडेट. तर शेतकरी मित्रांनो, जर हि माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की शेयर करा. जेणेकरून याचा फायदा इतर शेतकऱ्यांना सुद्धा होईल.
भेटूया अश्याच एका नवीन माहितीसोबत, तोपर्यंत धन्यवाद.
हे पण वाचा –
- आजचे हवामान अपडेट: महाराष्ट्रात तापमानाचा कहर! 37 अंशांच्या पार, नागरिक त्रस्त
- मोठी बातमी ! ऐन हिवाळ्यात ‘या’ भागात पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळणार, हवामान खात्याची चेतावणी
- पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज : ‘या’ तारखेपासून थंडीची तीव्रता वाढणार, 15 डिसेंबर नंतर पुन्हा पावसाची शक्यता!
- पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज ! ‘या’ भागात पावसाची शक्यता, तुमच्याकडे कसे राहणार हवामान? वाचा…
- NEW आजचे सोयाबिन बाजार भाव 26 सप्टेंबर 2024 Soyabin Bajar bhav