आज व उद्या या जिल्ह्यांमध्ये मुसळधार | आजचे हवामान | 48 तासांचा हवामान अंदाज

मान्सून 2021,हवामान अंदाज,पाऊस कधी येणार,मान्सूनने महाराष्ट्र व्यापला,28 जून हवामान अंदाज,विदर्भ,मराठवाडा,कोकण,मध्य महाराष्ट्र,पश्चिम महाराष्ट्र,havaman andaj maharashtra,हवामान अंदाज महाराष्ट्र 2021,आजचा हवामानाचा अंदाज,आम्ही कास्तकार, 27 जून हवामान अंदाज

पुणे : अरबी समुद्राचा पश्‍चिम भाग ते ओमानच्या दक्षिण भागांत चक्रीय वाऱ्याची स्थिती आहे. तर बंगालच्या उपसागराचा वायव्य भाग, झारखंड आणि पश्‍चिम बंगाल दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे विदर्भात पुढील पाच ते सहा दिवस जोरदार, तर मराठवाड्याच्या दक्षिण भागात आज (ता. २७) आणि उद्या (ता. २८) जोरदार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला. 

कोकणात अंशतः ढगाळ वातावरण असून, तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसत आहेत. मध्य महाराष्ट्रातही काहीसे ऊन असल्याने अधूनमधून ढग भरून येतात. त्यामुळे काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडत आहेत. मराठवाडा व विदर्भात गेल्या तीन दिवसांपासून 
राज्यातील बहुतांशी भागात ढगाळ हवामानासह हलक्या स्वरूपाच्या सरी पडत आहे. शनिवारी (ता. २६) सकाळच्या आठ वाजेपर्यंत खानदेशातील जळगाव येथे ३५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. 

मॉन्सून पुढील आठवड्यात सक्रिय होणार 
गेल्या आठ दिवसांत मॉन्सूनमध्ये कोणतीही फारशी प्रगती झालेली नाही. मात्र येत्या पाच ते सहा दिवसांत मॉन्सूनला सरकण्यासाठी पोषक वातावरण तयार होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे राजस्थान, पश्‍चिम उत्तर प्रदेश, हरियाना, चंडीगड आणि दिल्ली या भागांत मॉन्सून लवकरच दाखल होण्याची शक्यता आहे. शनिवारपर्यंत मॉन्सून आणखी काही भागांत मजल मारण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे. 

 जिल्ह्यांमध्ये होणार जोरदार पाऊस 
रविवार ः
 परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, संपूर्ण विदर्भ 
सोमवार ः जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, लातूर, संपूर्ण विदर्भ 
मंगळवार ः संपूर्ण विदर्भ 
बुधवार ः संपूर्ण विदर्भ

पोस्ट संदर्भ – पुढील 24 ते 48 तासांचा पावसाचा अंदाज आम्ही कास्तकार हवामान अंदाज

हे पण वाचा :

वरील माहिती आवडल्यास आपल्या पोस्टला आवश्यक जास्तीत जास्त शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि आपली एक अमूल्य प्रतिक्रिया द्यायला विसरू नका धन्यवाद

Related Posts

jowad cyclon - jowad chakrivadal

cyclone Jawad : आसमानी संकट! आता येणार ‘जोवाड’ चक्रीवादळ? हवामान खात्याचा राज्यांना इशारा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

x
X