Weather Alert: नमस्कार हवामान अंदाज महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत 24 सप्टेंबर साठीचा हवामान अंदाज आणि सोबतच बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची नेमकी स्थिती काय व त्यामुळे आज दिवसभरात कुठे असेल मुसळधार याबद्दल सविस्तर माहिती साठी हा लेख पूर्ण वाचा.
आजचे हवामान अंदाज 2021 live
नमस्कार तर राज्यात पावसाचा जोर कमी होऊन पुन्हा वाढणार पाहुयात याविषयी सविस्तर बातमी. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन, यामुळे राज्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
हे पण वाचा-
- Rain Alert 2023: राज्यात मराठवाड्यासह “इथे” विजांच्या गडगडाटांसह पावसाचा इशारा; पहा आजचा हवामान अंदाज
- Panjab Dakh Havaman Andaj | वातावरणात अचानक झाला मोठा बदल; आता ‘या’ जिल्ह्यातही ‘हे’ चार दिवस अवकाळी पाऊस पडणार
- Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल ; ‘हे’ सात दिवस ‘या’ भागात थंडीत पाऊस कोसळणार !
- Weather Update : राज्यात आज या जिल्ह्यात कडाक्याची थंडी? पहा आजचा हवामानाचा अंदाज
- Weather Update : फक्त थंडीच नाही तर पाऊसही येणार; हवामान विभागाचा अंदाज
तर संध्याकाळपर्यंत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार असून, पुढील 48 तासात त्याची तीव्रता वाढण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. तर आजही राज्यात जोरदार पावसाची शक्यता असून आज विदर्भातील बुलढाणा, अमरावती, वर्धा मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे.

हे पण वाचा – हवामान व शेतीविषयक व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
24 सप्टेंबर हवामान अंदाज – इथे होणार मुसळधार
तसेच मराठवाड्यातील उस्मानाबाद, बीड, जालना, औरंगाबाद तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, अहमदनगर, सातारा, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
व्हिडिओ – रात्रीच्या जोरदार पावसामुळे नद्यांना पूर
तर विदर्भातील अकोला, वाशीम, यवतमाळ तसेच कोकणातील रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असून राज्यातील इतर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
माहिती स्रोत | प्रादेशिक हवामान केंद्र, कुलाबा वेधशाळा मुंबई |
पत्ता | IMD Mumbai |
दिनांक | 24 सप्टेंबर 2021 |
संकलन | हवामान अंदाज महाराष्ट्र २०२१ |
तर मित्रांनो तुम्हाला जर 24 सप्टेंबर हवामान अंदाज हा लेख आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या हवामान अंदाज व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हायला विसरू नका धन्यवाद.