आजचे हवामान : विश्रांती घेतलेल्या मान्सूननं राज्यात पुन्हा एकदा चांगली हजेरी लावली आहे. आज महाराष्ट्रात सर्वदूर पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. पुढील दोन दिवस महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस अपेक्षित आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात आज काहीठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आला आहे.
अनुक्रमणिका
Toggleहवामान अंदाज विदर्भ
विदर्भातील सर्व जिल्ह्यांसाठी आज ऑरेंज अलर्ट, नाशिक, पालघरसाठी ऑरेंज अलर्ट, तर ठाणे, मुंबई, धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आलाय.
आजचे हवामान अंदाज 2021 live
विदर्भात देखील आज सर्वत्र पाऊस अपेक्षित आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राकडून व्यक्त करण्यात आला आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यांसाठी आज आॅरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने महाराष्ट्रात आज सर्वत्र पाऊस असणार, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
havaman andaj Kahndesh
नाशिक, पालघरसाठी ऑरेंज अलर्ट आज जारी करण्यात आला आहे. ज्यात 64 मिमी ते 200 मिमीपर्यंतचा पाऊस हा नाशिक आणि पालघरमधल्या काही भागात पडण्याची शक्यता आहे.
हे पण वाचा:- २9 ऑगस्ट २०२१ ते 1 सप्टेंबर पर्यंतचा पंजाब डख हवामान अंदाज
Kokan hawaman Andaz
मुंबई, ठाणे, रायगड परिसरात आज चांगला पाऊस बघायला मिळतो आहे. ज्यात काही ठिकाणी पावसाची संततधार देखील बघायला मिळाली. उत्तर महाराष्ट्रात आज आणि उद्या चांगला पाऊस होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगावमध्ये आज चांगला पाऊस बरसेल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. ह्या तिन्ही जिल्ह्यात आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ज्यात 24 तासात 15 मिमी ते 64 मिमीपर्यंत पाऊस ह्या जिल्ह्यातील काही ठिकाणी अपेक्षित आहे.
हे पण वाचा
हवामान अंदाज मराठवाडा
मराठवाड्यात देखील तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. ज्यात औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे ह्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
हे पण वाचा:
- राज्यात पुढील २ दिवस मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ भागांत धो-धो बरसणार, कसं असेल हवामान?
- Panjabrao Dakh Havaman Andaj | राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार; या जिल्ह्यांमध्ये जोरदार बरसणार
- Aaj che Havaman (आजचे हवामान): राज्यात पावसाचा जोर वाढणार! ‘या’ ठिकाणी होणार मुसळधार, IMD कडून यलो अलर्ट
- Maharashtra Weather August 2024 । महाराष्ट्रातील या 6 जिल्ह्यांमध्ये ‘यलो अलर्ट’ ; विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा
- IMD चा उद्याचा जिल्हानिहाय हवामान अंदाज; या १ १ जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज । Monsoon Alert Maharashtra
उद्याचे हवामान कसे असेल?
उद्या देखील उत्तर महाराष्ट्रातील काही ठिकाणी चांगल्या पावसाचा अंदाज आहे. ज्यात नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यात काहीठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
खालील व्हिडिओ पहा:
शेतकरी मित्रांनो यामध्ये तुमचा जिल्हा राहिला असेल तर आम्हाला कमेंट अवश्य करा जेणेकरून तुम्हाला पुढील अंदाजामध्ये त्या जिल्ह्याचा सुद्धा अंदाज नक्की मिळेल आणि जर ही माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना शेअर करून कृषी पत्रकारितेला पाठिंबा अवश्य द्या धन्यवाद.