Weather Update Today : महाराष्ट्रात मोसमी पाऊस सक्रिय होण्यास सध्या फारशी पोषक स्थिती नाही. त्यामुळे पुढील सहा दिवस म्हणजे १७ ऑगस्टपर्यंत राज्यभरात पावसाची शक्यता कमी आहे. १९ ऑगस्टपासून पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.
अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात सध्या सामान्य स्थिती आहे. त्यामुळे राज्यात मोसमी पाऊस पडण्यास पोषक स्थितीचा अभाव आहे. १७ ऑगस्टपर्यंत राज्यात पावसाचा जोर कमी असणार आहे. या काळात कोकणात काही ठिकाणी हलका आणि विदर्भात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो. राज्यात सर्वदूर मोसमी पाऊस या काळात उघडीप देईल.
अरबी समुद्रातून येणाऱ्या पश्चिमी बाष्पयुक्त वाऱ्यांचा वेग वाढून १८ किंवा १९ ऑगस्टपासून किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. साधारण २५ ऑगस्टपासून राज्यात बहुतेक भागात हलका पाऊस सुरू होऊन सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस होण्याची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
हे पण वाचा
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील सहा दिवस राज्यात पावसाची शक्यता कमी आहे. या काळात कोकणात काही ठिकाणी हलका आणि विदर्भात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो. १९ ऑगस्टपासून पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. साधारण २५ ऑगस्टपासून राज्यात बहुतेक भागात हलका पाऊस सुरू होऊन सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे.