Maharashtra Summer Weather Alert: उत्तर भारतातील राजस्थानसह महाराष्ट्रातील विदर्भ आणि दिल्लीतील काही भागांतील उष्णतेची लाट ही उद्यापासून (ता.३) ओसरायला सुरूवात होईल, अशी माहिती भारतीय हवामान खात्याकडून आज देण्यात आली. वायव्य भारतातील कमाल तापमानामध्ये तीन ते चार अंश सेल्सिअसची घट अपेक्षित असून तोच कल शुक्रवारपर्यंत कायम राहणे अपेक्षित आहे. सध्या राजस्थान आणि विदर्भातील अनेक ठिकाणांवरील पारा हा ४५ अंश सेल्सिअसच्याही पुढे गेला आहे.
उत्तर आणि मध्यभारतातील अनेक ठिकाणांवरील तापमान हे कमी होऊ लागणार असून जम्मू- काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, पूर्व मध्यप्रदेश, बिहार, ओडिशा, छत्तीसगड, झारखंड आणि अन्य काही दक्षिण भारतीय राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पश्चिमी चक्रवाताच्या प्रभावामुळे ही परिस्थिती बदलू लागली असून दक्षिण भागामध्ये यामुळे जोराचा पाऊस पडू शकतो असे हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. मध्यभारतातही दिवसाच्या तापमानामध्ये घट होणार असून येत्या तीन दिवसांमध्ये दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट होऊ शकते असेही सांगण्यात आले.
महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये मात्र आठवडाभर उष्णता राहू शकते असेही सांगण्यात आले. बंगालच्या महासागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता असून त्याच्या तीव्रतेबाबत मात्र हवामान विभाग साशंक आहे. याच कमी दाबाच्या पट्ट्याचे तीव्र वादळामध्ये रूपांतर होण्याची चिन्हे अधिक आहे असे हवामान खात्याचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी सांगितले.
वेगाने वारे वाहणार
अनुक्रमणिका
Toggleहे पण वाचा
हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार ओडिशा आणि बंगालमधील उष्णतेची लाट ३० एप्रिल रोजीच संपुष्टात आली असून पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये वेगाने वारे वाहू लागतील. वायव्य भारतासाठी ‘यलो वॉर्निंग’ जारी करण्यात आली आहे. येत्या ३ मे रोजी दिल्लीत पावसाची शक्यता असून राजस्थान, दिल्ली, हरियाना, पंजाबमध्ये वाऱ्याचा वेग अधिक असू शकतो.
Web Title: Weather Update Maharashtra Heat Wave Weather Department Expect Rain With Thunderstorms
इतर हवामान अंदाज –
- Weather Today | मुंबईत ‘हीट वेव्ह’चा अलर्ट ! उत्तरेपासून मध्य भारतापर्यंत तापमानात वाढ, जाणून घ्या आजचे हवामान
- All India Weather Update: उत्तर भारतात तापमानात वाढ, तर महाराष्ट्रात येत्या दोन दिवसात ढगाळ वातावरणाची शक्यता
- Weather Alert : राज्यासाठी पुढचे २ दिवस महत्त्वाचे, ‘या’ जिल्ह्यांना पावसासह गारपिटीचा इशारा
- महाराष्ट्रात गारपिटीचं संकट; पुढील 3 दिवस राज्यभर विजांचा गडगडाट, हवामान खात्याचा हाय Alert
- देशात उन्हाळ्याची चाहूल; महाराष्ट्रात कधीपासून वाढणार पारा, हवामान खात्याची लेटेस्ट अपडेट
नाव | भारतीय हवामान विभाग यांचा अंदाज |
---|---|
विभाग | प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई |
पत्ता | IMD Mumbai |
दिनांक | 03 मे 2022 |
फेसबुक | दररोज हवामान अंदाजासाठी फेसबुक पेज लाईक करा |
हवामान अंदाज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा | |
संकलन | आजचे हवामान महाराष्ट्र 2022 |
पंजाब डख हवामान अंदाज Whatsapp Group
शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अंदाज मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अवश्य जॉईन व्हा. धन्यवाद!