× WhatsApp Icon

शासकीय माहिती आणि योजना WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा!

जॉईन करा
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग

Rain Update : राज्यावरील कमी दाबाचा पट्टा कायम, या जिल्ह्यांना मुसळधारेचा इशारा हवामान विभागाचा नवीन हवामान अंदाज…

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn
imd of 5 days imd weather alert

Weather Forecast In Mumbai Pune And Maharashtra : राज्यात गेल्या आठवड्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. खास करून कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडला. आता हवामान विभागाने मोठी अपडेट दिली आहे.

Weather Forecast In Mumbai Pune And Maharashtra : The state witnessed heavy rainfall last week. Heavy rains particularly occurred in some districts of Konkan, Vidarbha and Marathwada. Now the weather department has given a big update.

आठवडाभर चौफेर हजेरी लावलेल्या पावसाचा जोर आज, सोमवारपासून (२४ जुलै) ओसरणार आहे. शहरात आकाश सामान्यत: ढगाळ राहणार असून, हलक्या सरींची शक्यता आहे. घाट विभागात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) व्यक्त केला आहे.

Responsive Weather Iframe
तुमच्या भागाचा लाईव्ह हवामान अंदाज

The heavy rains that have been present throughout the week will subside from today, Monday (July 24). The sky will be generally cloudy in the city with light showers likely. The India Meteorological Department (IMD) has predicted heavy rain at some places in the Ghats.

पुण्यात रविवारी सलग दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच रिपरिप सुरू होती. सकाळी हलक्या सरी; पण दुपारनंतर काही वेळासाठी मध्यम स्वरूपाच्या सरी बरसल्या. थोड्या वेळाच्या विश्रांतीनंतर पाऊस पडत होता. सुट्टी असली, तरी पावसामुळे नागरिकांनी सायंकाळी घराबाहेर फेरफटका, फिरायला जाणे टाळले. रात्री आठनंतर पावसाचा जोर वाढला. दिवसभरात हवेत गारवा होता. रात्री साडेआठपर्यंत १.६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

शहरासह मध्य महाराष्ट्राच्या विविध भागांत पावसाने कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावली. राज्यावरील कमी दाबाचा पट्टा कायम असून, कोकणचा काही भाग आणि मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर तुरळक भागात अतिवृष्टीची शक्यता ‘आयएमडी’तर्फे वर्तविण्यात आली आहे.

पर्यटनस्थळी गर्दी

पावसाळी वातावरण आणि धुक्यात हरवलेल्या पर्यटनस्थळांवर फिरण्याचा आनंद घेण्यासाठी नागरिक सकाळीच शहराबाहेर पडले होते. ताम्हिणी, मुळशी, पौड, लोणावळ्यामध्ये सकाळी दहापासूनच पर्यटकांची गर्दी झाली होती. खडकवासला, सिंहगड, पानशेत परिसरात पर्यटकांची दिवसभर वर्दळ होती. अनेकांनी सहकुटुंब वर्षासहलीची मजा अनुभवली. सायंकाळी पाचनंतर पर्यटकांनी परतीचा वाट धरल्याने शहरात येणाऱ्या मुख्य रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी झाली होती.

रायगड जिल्ह्यातील सर्व शाळांना आज सुट्टी

रायगड जिल्ह्यातील सगळ्या शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्टचा इशारा असल्यामुळे ही सुट्टी जाहीर करत असल्याचे पत्र रायगड जिल्हा प्रशासनाकडून रविवारी सायंकाळी उशिरा जारी करण्यात आले आहे. यासह मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गलगत असलेल्या सवत सडा धबधब्यावर पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. चिपळूण प्रांताकाऱ्यांकडून आदेश जारी करण्यात आला आहे.

In Pune, for the second day in a row on Sunday, the recovery started from the morning itself. Light showers in the morning; But there were moderate showers for some time in the afternoon. After a short rest it was raining. Although it was a holiday, due to the rain, citizens avoided going out for a walk in the evening. After eight in the night, the rain increased. The air was chilly during the day. 1.6 mm of rain was recorded till 8:30 in the night.

Rains occurred more or less in various parts of Madhya Maharashtra including the city. The low pressure zone over the state continues, the IMD has predicted the possibility of heavy rainfall in some parts of Konkan and isolated areas over Ghat Matha in Madhya Maharashtra.

Crowded tourist spots

Citizens came out of the city early in the morning to enjoy the rainy weather and sightseeing spots lost in the fog. Tamhini, Mulshi, Poud, Lonavala were crowded with tourists from ten in the morning. Khadakwasla, Sinhagad, Panshet areas were thronged with tourists throughout the day. Many enjoyed the family vacation. After five in the evening, there was a traffic jam on the main roads leading to the city as tourists waited to return.

Holiday for all schools in Raigad district today

Holiday has been announced for all the schools in Raigad district today. Raigad district administration has issued a letter late on Sunday evening declaring this holiday due to orange alert warning by Meteorological Department. Along with this, tourists have been banned from the Savat Sada Falls, which is located along the Mumbai-Goa National Highway. An order has been issued by the Chiplun district officials.

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn
Follow us

---Advertisement---

LATEST Post

Close Visit Havaman Andaj

WhatsApp Icon Telegram Icon