Weather Update : राज्याच्या काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. राज्यात आजही अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये आज अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
राज्यातील बुलडाणा, वाशिम, अकोला, नागपूर, अमरावती, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, राज्यातील 5 ते 6 जिल्हे वगळता राज्यभरात यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुण्यातही आज यलो अलर्ट देण्यात आला असून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शनिवारपासून(२२ सप्टेंबर) पावसाचा जोर पुन्हा कमी होण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे सध्या राज्यात मुसळधार पाऊस बरसत आहे. पावसामुळे शेतकरी आणि नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
हे पण वाचा
तर सुकलेल्या पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. तर राज्यात काही भागात पाण्याअभावी शेतकऱ्यांची पिकं वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. अमरावती जिल्ह्यातही आज मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.