Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग

Maharashtra rain IMD Alert: पुढील 48 तास मुसळधार पावसाचे, 3 जिल्ह्यांना रेड तर 12 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn
IMD-Alert_14thJuly havaman Andaj (1)

Maharashtra Rain updates: राज्यात पावसाचा जोर कायम असतानाच आता पुढील 48 तासांत काही भागांत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

थोडं पण कामाचं

  • पुढील 48 तासांत काही भागांत मुसळधार पावसाचा अंदाज 
  • 14 जुलै रोजी राज्यातील 3 जिल्ह्यांना रेड अलर्ट तर 12 जिल्ह्यांना हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट

राज्यात पावसाचा जोर आजही कायम पहायला मिळत आहे. त्यातच आता पुढील 48 तासांत राज्यातील काही भागांत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यात काही भागांत अतिवष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार (14 जुलै 2022) राज्यातील तीन जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे तर 12 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. रेड अलर्ट देण्यात आलेल्या जिल्ह्यांमध्ये पालघर, नाशिक आणि पुणे जिल्ह्यांचा समावेश आहे.

Responsive Weather Iframe
तुमच्या भागाचा लाईव्ह हवामान अंदाज

हे पण वाचा – Maharashtra rain IMD Alert: पंजाब डख नवीन हवामान अंदाज । आजपासून इथे पावसाचा जोर ओसरणार, पण…

14 जुलैचं हवामान अंदाज

रेड अलर्ट – पालघर, नाशिक, पुणे

ऑरेंज अलर्ट – मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर

यल्लो अलर्ट – नंदुरबार, धुळे, जळगाव, औरंगाबाद, अहमदनगर, बीड, जालना, बुलढाणा, अकोला, वाशिम, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.

हे पण वाचा : नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचं अनुदान, शिंदे सरकारचा मोठा निर्णय

त्याच प्रमाणे 15 जुलै रोजी सुद्धा काही भागांत जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यानुसार, पालघर, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, नाशिक, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांना यल्लो अलर्ट देण्यात आला आहे.

हे पण वाचा : Monsoon Update: राज्यात ‘या’ ठिकाणी अतिमुसळधारेचा इशारा, पंजाब डख यांचा नवीन अंदाज

पुढील हवामानाचा अंदाज आणि इशारा

14 जुलै – कोकण – बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. 

14 जुलै – मध्य महाराष्ट्र – बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी अतिवृष्टीसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

14 जुलै – मराठवाडा – बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

14 जुलै – विदर्भ – बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाटासह तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

15 जुलै – कोकण – बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. 

15 जुलै – मध्य महाराष्ट्र – बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी अतिवृष्टीसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

15 जुलै – मराठवाडा – बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

15 जुलै – विदर्भ – बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

आजचा हवामानाचा अंदाज

नावहवामान अंदाज महाराष्ट्र राज्य
विभागभारतीय हवामान शास्त्र विभाग
पत्ताहवामान विभाग – IMD
दिनांक13 जुलै 2022
संकलनआजचे हवामान महाराष्ट्र 2022

पंजाब डख हवामान अंदाज Whatsapp Group

मित्रांनो दररोज जिल्हानिहाय हवामान अंदाज मिळवण्यासाठी आणि त्याचबरोबर पंजाब डख हवामान अंदाज व हवामान विभागाचे अपडेट निशुल्क मिळवण्यासाठी इथे क्लिक करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा आणि हि माहिती जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn
Follow us

---Advertisement---

LATEST Post

Close Visit Havaman Andaj

WhatsApp Icon Telegram Icon