Maharashtra Rain Update: काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. नागरिकांना प्रशासनाकडून सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
थोडं पण कामाचं
- राज्यात पावसानं हाहाकार माजवला आहे.
- राज्यातल्या अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरू आहे.
- पुढच्या 48 तासांसाठी राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Maharashtra Rain Update: राज्यात पावसानं हाहाकार माजवला आहे. राज्यातल्या अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरू आहे. सतत होणाऱ्या मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी पूरसदृश्य (Flood) परिस्थिती निर्माण झाली आहे. तर पुढच्या 48 तासांसाठी राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. नागरिकांना प्रशासनाकडून सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पालघर, (Palghar) पुणे शहर (Pune city) , गडचिरोली (Gadchiroli), या ठिकाणी पुढचे दोन दिवस अतिवृष्टीचा (Heavy Rainfall) इशारा देण्यात आला असून रेड अलर्ट (Red Alert) जारी करण्यात आला आहे.
सध्या पावसानं मुंबई, ठाणे, पालघर, कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये धुमाकूळ घातला आहे. येत्या दोन दिवसात पावसाचा जोर असाच कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातल्या अनेक ठिकाणच्या शाळा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
पुणे, कोल्हापूर, सातारा, गडचिरोली या ठिकाणी हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर अनेक ठिकाणी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आज मुंबई, कोकण, पुणे, नाशिकच्या काही भागात पावसाचा जोर आजही वाढण्याची शक्यता आहे. राज्याच्या अनेक भागांमध्ये आज पावसामुळे दरडी आणि घरे कोसळण्याच्या घटना घडल्या.
साताऱ्यातील कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात 24 तासांत तब्बल पाच टीएमसीने वाढ झाली आहे. नाशिकमध्ये ही पावसाची संततधार कायम आहे.
कोकणातील पावसाची परिस्थिती
कोकणासह राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. खेड तालुक्यात जगबुडी नदी वारंवार धोक्याची पातळी ओलांडत आहे. रायगड जिल्ह्यातील सावित्री, अंबा, कुंडलिका, पाताळगंगा या चार प्रमुख नद्यांनी इशारा पातळी गाठली आहे. नद्यांना पूर आल्यानं पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सावधगिरीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
अनुक्रमणिका
Toggleहे पण वाचा
या भागातल्या शाळांना सुट्टी
ठाणे, पालघर, नवी मुंबई, पनवेल महापालिका क्षेत्रातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठाच्या उद्या होणाऱ्या परीक्षा सुद्धा रद्द करण्यात आल्या आहेत. ठाण्यात इयत्ता 12वी पर्यंतच्या शाळांना 14 आणि 15 जुलै रोजी अशी दोन दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे पुण्यातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. पिंपरी चिंचवडमधील शाळा आज बंद असतील. कोल्हापूर, सातारा, सांगली, रायगड, नांदेड या जिल्ह्यांमध्ये शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
या जिल्ह्यांना अलर्ट जारी
- रेड अलर्ट
पालघर, नाशिक, पुणे
- ऑरेंज अलर्ट
मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर
- यलो अलर्ट
नंदुरबार, धुळे, जळगाव. अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, बुलढाणा, अकोला, वाशिम, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली
राज्यभर पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे राज्यातील अनेक नद्यांच्या आणि धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. राज्यातल्या अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे जनजीवनही विस्कळीत झालं आहे.
आजचा हवामानाचा अंदाज
नाव | हवामान अंदाज महाराष्ट्र राज्य |
---|---|
विभाग | भारतीय हवामान शास्त्र विभाग |
पत्ता | हवामान विभाग – IMD |
दिनांक | 14 जुलै 2022 |
संकलन | आजचे हवामान महाराष्ट्र 2022 |
पंजाब डख हवामान अंदाज Whatsapp Group
मित्रांनो दररोज जिल्हानिहाय हवामान अंदाज मिळवण्यासाठी आणि त्याचबरोबर पंजाब डख हवामान अंदाज व हवामान विभागाचे अपडेट निशुल्क मिळवण्यासाठी इथे क्लिक करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा आणि हि माहिती जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद