hawaman andaz-for-3-days (1)

Maharashtra Weather: पुढील ३ दिवसात इथे जोरदार पाऊस; २७ ते २९ ऑगस्ट हवामान अंदाज

Maharashtra Weather: बंगाल उपसागराच्या वायव्य भागात व तमिळनाडूच्या किनारपट्टीदरम्यान चक्रीय वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. यामुळे पूर्व विदर्भात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. पुढील चार ते पाच दिवस पूर्व विदर्भात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याचा इशारा वर्तविला आहे.

आजचे हवामान अंदाज 2021 live

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा हिमालयाच्या पायथ्याशी सक्रिय आहे. मॉन्सूनचा आस उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे. ईशान्य राजस्थान आणि लगतच्या परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे.

ही स्थिती समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर आहे. तसेच बंगालच्या उपसागराच्या वायव्य भागात चक्रीय स्थिती सक्रिय झाली आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर असल्याने पूर्व विदर्भात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.  

उद्याचा हवामान अंदाज

गेल्या चार ते पाच दिवसांपासून राज्यात पावसाने पुन्हा उघडीप दिली आहे. अनेक ठिकाणी अंशत: ढगाळ हवामानासह कोरडे हवामान होत आहे. पुढील चार ते पाच दिवस पूर्व विदर्भ वगळता उर्वरित राज्यात पावसाची उसंत कायम राहणार आहे.

सध्या मराठवाड्यात काही ठिकाणी, कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. पावसाला पोषक हवामान नसल्याने बहुतांशी ठिकाणी पाऊस गायब झाला असून, पावसाची उघडीप कायम राहण्याची शक्यता आहे.

hawaman andaz

बुधवारी (ता. २५) सकाळी आठ वाजेपर्यंत चंद्रपूर येथे ३५.५ अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

येथे होणार पाऊस 

  • शुक्रवार ः नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, संपूर्ण राज्यात तुरळक सरी
  • शनिवार ः नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, संपूर्ण राज्यात तुरळक सरी
  • रविवार ः नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, संपूर्ण राज्यात तुरळक सरी

हे पण वाचा:

Related Posts

Ramchandra Sabale Havaman Andaj 48 hoursjpg

Weather Alert: येत्या 48 तासात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज

ramchandra sabale havaman andaj

Weather Update: राज्यात पुढील चार दिवस पावसाचा जोर कायम डाॅ रामचंद्र साबळे हवामान अंदाज महाराष्ट्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

X