Gulab Cyclone Alert: बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेलं गुलाब चक्रीवादळ (Cyclone Gulab) आज मध्य रात्रीपर्यंत आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीला धडकणार आहे.
गुलाब चक्रीवादळ । Gulab Cyclon Update
भुवनेश्वर, 26 सप्टेंबर: बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेलं गुलाब चक्रीवादळ (Cyclone Gulab) आज मध्य रात्रीपर्यंत आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीला धडकणार आहे. ताशी 85 ते 95 किमी प्रतितास वेगानं हे वादळ किनारपट्टीच्या दिशेनं मार्गक्रमण करत असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
त्यामुळे येत्या काही तासांत आध्र प्रदेश आणि ओडिशा राज्यातील किनारपट्टीवर वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने याठिकाणी रेड अलर्ट जारी केला आहे.
बंगालच्या उपसागरात मागील काही दिवसांपासून हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र कार्यरत होतं. शनिवारी दुपारी हे क्षेत्र अधिक तीव्र झाल्यानंतर याठिकाणी चक्रीवादळ निर्माण झालं आहे. रविवारी मध्यरात्रीपर्यंत हे वादळ आंध्र प्रदेशच्या उत्तर किनारपट्टीला आणि ओडिशाच्या दक्षिण किनारपट्टीला धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
याचा परिणाम म्हणून पुढील तीन ते चार दिवस महाराष्ट्रात वेगवान वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे चक्रीवादळ आज सायंकाळपर्यंत कलिंगपट्नम आणि गोपालपूरम याठिकाणी धडकण्याची शक्यता IMD ने वर्तवली आहे.
सध्या हे चक्रीवादळ गोपालपूरच्या पूर्व-दक्षिण दिशेला 270 किलोमीटर अंतरावर आहे. तर कलिंगपट्नम पासून याचं अंतर 330 किमी दूर आहे. सध्या या वादळात वाऱ्याचा वेग 75 ते 85 किमी प्रतितास इतका असून पुढील काही तासांत वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे.
जवळपास 95 किमी प्रतितास वेगाने हे चक्रीवादळ किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान खात्याने किनारपट्टीवर राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
हेही वाचा-
- Weather Update : राज्यात मुसळधार पावसाचा इशारा! कुठे ऑरेंज तर कुठे यलो अलर्ट; वाचा हवामान विभागाचा अंदाज
- Maharashtra Rain Update : येत्या चार ते पाच दिवसांत राज्यात ‘या’ जिल्ह्यात मुसळधार; वाचा हवामान विभागाचा अंदाज
- IMD Rain Alert : राज्यासाठी पुढील चार दिवस महत्त्वाचे; ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार मेघगर्जनेसह पाऊस, IMD कडून अलर्ट जारी
- Maharashtra Rain : महाराष्ट्रात पुन्हा पावसाच्या मुसळधारा? पहा आजचा नवीन हवामान अंदाज
- IMD Rain Alert : आज या जिल्ह्यांमध्ये तुफान पाऊस, पहा आजचा हवामान अंदाज
भारतीय हवामान खात्याने संबंधित ठिकाणांना रेड अलर्ट जारी केला असून अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे याठिकाणी जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
याचा परिणाम म्हणून विदर्भ, तेलंगणा, मराठवाडा कोकण, मुंबई आणि गुजरातमध्ये काही ठिकाणी 29 सप्टेंबरपर्यंत जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच मच्छिमारांनी बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात न जाण्याच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
नाव | भारतीय हवामान विभाग यांचा अंदाज |
---|---|
विभाग | प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई – Gulab Chakrivadal Update |
पत्ता | IMD Mumbai व IMD New Delhi |
दिनांक | 26 सप्टेंबर 2021 |
संकलन | आजचे हवामान महाराष्ट्र 2021 |
मित्रांनो दररोज जिल्हानिहाय हवामान अंदाज मिळवण्यासाठी आणि त्याचबरोबर पंजाब डख यांचे अपडेट व हवामान विभागाचे अपडेट निशुल्क मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा आणि हि माहिती जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद