नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Weather Today | मार्च महिन्यात देशभरात हवामान कोरडे झाले. उत्तर पश्चिम आणि मध्य भारताच्या कमाल तापमानात सातत्याने वाढ होत आहे. त्याचबरोबर अनेक भागात उष्णतेची लाटही सुरू आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागानुसार (IMD), सौराष्ट्र आणि कच्छच्या काही भागांमध्ये भीषण उष्णता आणि उष्णतेच्या लाटेची स्थिती आहे. याशिवाय महाराष्ट्र आणि पश्चिम राजस्थानच्या किनारी भागात तापमानात वाढ होऊन उष्ण वारे वाहण्याची शक्यता आहे. (Weather Today)
या राज्यांमध्ये पावसाची शक्यता
आयएमडीनुसार, उप – हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीमवर चक्रीवादळाचे परिवलन कायम आहे. त्याच वेळी, दक्षिण छत्तीसगड आणि लगतच्या भागात कमी पातळीवर चक्रीवादळाचे परिवलन कायम आहे. हवामान अंदाजानुसार, अंदमान आणि निकोबार बेटांच्या काही भागात हलका पाऊस पडू शकतो. (Weather Today)
दिल्लीतील हवामान स्थिती
दिल्लीचे हवामान आज दिवसभर स्वच्छ राहील. त्याचबरोबर आज येथे जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत आगामी काळात दिल्लीतील जनतेने सावध राहण्याची गरज आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत आजचे किमान तापमान 18 अंश सेल्सिअस राहील, तर कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
अनुक्रमणिका
Toggleप्रमुख शहरांमधील आजचे तापमान
शहर – किमान – कमाल तापमान
– दिल्ली – 16.0 – 33.0
– श्रीनगर – 5.0 – 20.0
– अहमदाबाद – 21.0 – 39.0
– भोपाळ – 17.0 – 31.0
– चंदीगड – 18.0 – 23.0
– डेहराडून – 14.0 – 31.0
– जयपूर – 20.0 – 37.0
हे पण वाचा
– शिमला – 13.0 – 24.0
– मुंबई – 24.0 – 37.0
– लखनौ – 17.0 – 35.0
– गाझियाबाद – 17.0 – 28.0
– जम्मू – 15.0 – 28.0
– लेह – 00 – 12.0
– पाटणा – 18.0 – 34.0
मुंबईत उष्णतेच्या लाटेचा इशारा
मुंबई, ठाणे आणि रायगडच्या विविध भागात आज म्हणजेच मंगळवारी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
आयएमडीने उत्तर कोकण, ठाणे, मुंबई आणि रायगडमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देऊन दोन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. मुंबईचे किमान तापमान 23 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस राहील.
Web Title :- Weather Today | weather update today 15 march heat wave in mumbai rajasthan gujrat temprature raise delhi weather forecast imd alert