पुणेः राज्यात पावसाचा जोर (Rain Intensity) काहीसा कमी झालाय. मात्र कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही मंडळांमध्ये हलका ते मध्यम पाऊस (Rainfall) पडतोय. तर माॅन्सूनने (Monsoon Update) देशातील आणखी काही भागांमधून काढता पाय घेतला. उद्या सकाळपर्यंत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता (Rain Forecast With Lightning) हवामान विभागानं (Weather Department) वर्तविली.
माॅन्सूनने आज देशाच्या काही भागांतून काढता पाय घेतला. माॅन्सूनने आज उत्तर अरबी समुद्र, गुजरातचा बहुतांशी भाग, पश्चिम मध्य प्रदेशचा काही भाग, उत्तराखंड सौराष्ट्र आणि कच्छ, गुजरात, हरियाना, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर आणि पश्चिम उत्तर प्रदेशच्या काही भागातून माॅन्सून परतला आहे. या भागांमध्ये परतीचा पाऊस जोरदार बरसत आहे.
कोकणात आज पावसाचा जोर आज कमी होता. काही ठिकाणी मध्यम ते हलक्या सरी पडल्या. रायगड जिल्ह्यातील मानगाव मंडळात ३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर वाकवली मंडळात हलक्या सरी पडल्या. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ आणि मुलदे येथे पावसाचा शिडकावा झाला. कोकणात मागील काही दिवासांपासून पाऊस कमी झालाय.
मध्य महाराष्ट्रातही काही मंडळांमध्ये पावसाने हजेरी लावली. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे सर्वाधिक ६० मिलिमीटर पाऊस झाला. पुणे जिल्ह्यातील दौंड आणि लोणावळा येथेही हलक्या पावसाने हजेरी लावली. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ आणि सांगली जिल्ह्यातील कसबेडिग्रस आणि कडेगाव या मंडळांमध्येही पाऊस झाला.
हे पण वाचा
तसचं जळगाव आणि धुळे जिल्ह्यातही काही ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. विदर्भ आणि मराठवाड्यात आज पावसानं उघडीप दिली. काही ठिकाणी हलक्या सरी पडल्या मात्र पावसाचा जोर कमीच होता.