Latest Weather Forecast Today: मागील काही दिवसांपासून सातत्यानं उत्तर भारतात वेस्टर्न डिस्टर्बन्सेसचा प्रकोप सुरू आहे. त्यामुळे हिमालयातील काही प्रदेशासह उत्तर भारतात पाऊस आणि हिमवर्षावाची स्थिती निर्माण झाली आहे.
मुंबई, 04 मार्च: मागील काही दिवसांपासून सातत्यानं उत्तर भारतात वेस्टर्न डिस्टर्बन्सेसचा प्रकोप सुरू आहे. त्यामुळे हिमालयातील काही प्रदेशासह उत्तर भारतात पाऊस आणि हिमवर्षावाची स्थिती निर्माण झाली आहे. उत्तरेत पावसाची स्थिती असली तरी महाराष्ट्रासह मध्य भारतात उन्हाचा चटका (Temperature rise in maharashtra) वाढला आहे. 7 ते 10 मार्च दरम्यान पुण्यासह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दिवस आणि रात्रीच्या वेळी किमान तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 7 मार्चपासून महाराष्ट्रातील हवामान हिवाळ्यातून (Winter) उन्हाळ्यात (Summer) प्रवेश करेल, असा अंदाज हवामान विभागाकडून (IMD) वर्तवला आहे.
हवामान खात्यानं जारी केलेल्या अद्ययावत माहितीनुसार, 3 मार्चनंतर पुण्यासह उत्तर-मध्य महाराष्ट्रामध्ये रात्रीचं तापमान वाढण्याची शक्यता आहे. चालू आठवड्याच्या तुलनेत 3 मार्चनंतर देशातील बहुतांशी भागांत पारा वाढण्याची शक्यता आहे. 4 ते 10 मार्च दरम्यान कोकणातील भागांसह राज्याच्या बहुतेक भागांतील किमान तापमान सरासरी तापमानाजवळ किंवा किंचित कमी राहण्याची शक्यता आहे. तर उत्तर-मध्य महाराष्ट्रात किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे.
हेही वाचा –
- Weather Update | 2 फेब्रुवारीपर्यंत थंडीची लाट, राज्यात इथे अवकाळी पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
- Rain Alert 2023: राज्यात मराठवाड्यासह “इथे” विजांच्या गडगडाटांसह पावसाचा इशारा; पहा आजचा हवामान अंदाज
- Panjab Dakh Havaman Andaj | वातावरणात अचानक झाला मोठा बदल; आता ‘या’ जिल्ह्यातही ‘हे’ चार दिवस अवकाळी पाऊस पडणार
- Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल ; ‘हे’ सात दिवस ‘या’ भागात थंडीत पाऊस कोसळणार !
- Weather Update : राज्यात आज या जिल्ह्यात कडाक्याची थंडी? पहा आजचा हवामानाचा अंदाज
खरंतर, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या बहुतांश भागात दिवसाचं तापमान वाढलं असलं तरी रात्रीचं तापमान सामान्य किंवा किंचित वाढलं आहे. पण 4 मार्चनंतर महाराष्ट्रात दिवसा आणि रात्रीच्या तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा- आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील चालू बाजारभाव
भारतीय हवामान खात्याच्या पुणे वेधशाळेचे शास्त्रज्ञ अनुपम कश्यपी यांनी सांगितलं की, “सकाळच्या वेळी तापमानात किंचित घट वगळता, पुढील काही दिवसांत महाराष्ट्राच्या बहुतांशी भागांमध्ये किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या पश्चिम हिमालयीन प्रदेशावर सातत्याने धडकणाऱ्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे किमान तापमानात वाढ होत आहे. तसेच पूर्वेकडील वाऱ्यांमुळे मध्य भारतात येणाऱ्या थंडगार वाऱ्यांना अडथळे निर्माण होत आहेत. परिणामी महाराष्ट्रासह मध्य भारतातील तापमान वाढत आहे.”