Latest Weather Forecast: आजपासून पुढील तीन दिवस महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळण्याची शक्यता (rainfall) आहे.
हवामान अंदाज महाराष्ट्र, 07 मार्च: पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे सध्या अनेक ठिकाणी पावसासाठी पोषक हवामान (Rainy Weather) निर्माण झालं आहे. आजपासून पुढील तीन दिवस महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळण्याची शक्यता (rainfall) आहे. पुढील तीन दिवस भारतीय हवामान खात्याने (IMD) उत्तर महाराष्ट्रासह, कोकण, मराठवाडा आणि विदर्भात जवळपास सर्वच ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
याशिवाय महाराष्ट्राची राजधानी मुंबईवर (Cyclone Alert in Mumbai) चक्रीवादळाचं संकट घोंघावू लागलं आहे. मुंबईत कमाल तापमानात वाढ होत असल्यानं मुंबईकर हैराण झाले आहेत. दिवसेंदिवस मुंबईच्या तापमानात वाढ होत असून, वाढते तापमान धोकादायक पातळीकडे वाटचाल करत असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. तसेच, समुद्राचे तापमान वाढल्यास मुंबईवर चक्रीवादळाचं संकट निर्माण होण्याची शक्यता धक्कादायक माहिती इंटरगर्व्हन्मेटल पॅनल ऑन क्लायमेट चेंजच्या सहाव्या मूल्यांकन अहवालातून समोर आली आहे.
8 आणि 9 मार्च रोजी राज्यात पावसाची व्याप्ती आणखी वाढणार असून राज्यात जवळपास सर्वच ठिकाणी पाऊसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या दोन दिवसांत मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी गारपिटीची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मंगळवारी दक्षिण महाराष्ट्रातील सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, सिंधुदुर्ग, नांदेड आणि मुंबई ही जिल्हे वगळता राज्यात सर्वत्र येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. संबंधित जिल्ह्यात मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे. बुधवारी देखील कमी अधिक प्रमाणात हीच स्थिती कायम राहणार आहे. त्यानंतर गुरुवारपासून मात्र पावसाचा जोर हळुहळू कमी होण्याची शक्यता आहे.
हे पण वाचा
हे पण वाचा –
- राज्यात पुढील २ दिवस मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ भागांत धो-धो बरसणार, कसं असेल हवामान?
- Panjabrao Dakh Havaman Andaj | राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार; या जिल्ह्यांमध्ये जोरदार बरसणार
- Aaj che Havaman (आजचे हवामान): राज्यात पावसाचा जोर वाढणार! ‘या’ ठिकाणी होणार मुसळधार, IMD कडून यलो अलर्ट
- Maharashtra Weather August 2024 । महाराष्ट्रातील या 6 जिल्ह्यांमध्ये ‘यलो अलर्ट’ ; विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा
- IMD चा उद्याचा जिल्हानिहाय हवामान अंदाज; या १ १ जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज । Monsoon Alert Maharashtra