Maharashtra Rain Update : राज्यातून मान्सून दोन दिवसांपूर्वी परतला आहे. मान्सून गायब झाल्याने राज्यातील किमान तापमानात आता थोडी घट झाली असून अनेक ठिकाणी गारवा जाणवत आहे. पण मुंबई अजूनही दमट आणि उष्ण हवामान अनुभवत आहे. मात्र, पुढील 48 तासांत राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. येत्या काही तासांत येथे मुसळधार पावसाची शक्यता आहे.
आजचे हवामान अंदाज 2021 live
नाशिक, धुळे, जळगाव, औरंगाबाद, बुलडाणा, जालना, परभणी, लातूर, नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला, यवतमाळ, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, नागपूर आणि गडचिरोलीसह 18 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
लाईव्ह हवामान अंदाज
पुढील काही तासांमध्ये येथे वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अतीमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. दरम्यान, 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान खात्याच्या तज्ज्ञांनी परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
आजचे हवामान काय आहे?
सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. पुढील काही तासांत या भागात तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे ओडिशाच्या किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. परिणामी, महाराष्ट्रातही वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडेल. उद्या राज्याच्या अनेक भागात मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मात्र राज्यात पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे.
हे वाचलंत का?
- Monsoon Update : ‘या’ तारखेला होणार राज्यात मान्सून दाखल! पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज
- Monsoon Update: यंदा मान्सूनची जोरदार बॅटिंग, धो-धो बरसणार, पण जूनमध्ये…; IMD चा हवामान अंदाज
- Monsoon Updates: IMD ने मान्सूनबाबत दिली गुड न्यूज, एल निनोचा धोका असतानाही असा बरसणार पाऊस
- Monsoon Update : सध्या मान्सून कुठे आला, राज्यात मान्सून कधी येणार?, काय आहे IMD चा अंदाज
- या तारखेला येणार राज्यात मान्सून, राज्यात हवामानाबाबत पंजाबराव डख यांचे मोठे संकेत ! monsoon update
दुसरीकडे, मान्सून राज्यातून परत गेल्यापासून अनेक ठिकाणी किमान तापमानात घट झाली आहे. सकाळचे वातावरण थोडे थंड असते. महाबळेश्वरमध्ये आज किमान 15.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सातारा (18.7), नाशिक (16.3), सोलापूर (18.6), औरंगाबाद (18.4), पुणे (18.4) आणि बारामती येथे किमान 18.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
Credit - marathi paper
पंजाब डख हवामान अंदाज पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
??????
नाव | भारतीय हवामान विभाग यांचा अंदाज |
---|---|
विभाग | प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई |
पत्ता | IMD Mumbai व IMD New Delhi |
दिनांक | 18, 19, 20 ऑक्टोबर 2021 |
फेसबुक | दररोज हवामान अंदाजासाठी फेसबुक पेज लाईक करा |
हवामान अंदाज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा | |
संकलन | आजचे हवामान महाराष्ट्र 2021 |
शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अभ्यासक Panjabrao dakh patil mobile number यांचा अंदाज मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटचे नोटिफिकेशन सुरू करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अवश्य जॉईन व्हा. धन्यवाद!