Weather Update: पुढील तीन ते चार तासांत मुंबईसह (Rainfall in Mumbai) पाच जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून (IMD alerts today) वर्तवण्यात आली आहे
मुंबई, 31 ऑगस्ट: काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय (Monsoon Active in Maharashtra) होतं आहे. गेल्या आठवड्यापासून मुंबईसह विदर्भात आणि मध्य महाराष्ट्रात कोसळधारा सुरू आहेत. यानंतर आता कोकणातही पावसासाठी पोषक हवामान निर्माण होतं आहे. याच पार्श्वभूमीवर पुढील तीन ते चार तासांत मुंबईसह (Rainfall in Mumbai) पाच जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून (IMD alerts today) वर्तवण्यात आली आहे. आज सकाळपासूनच संबंधित जिल्ह्यात ढगाळ हवामानाची (Cloudy weather ) नोंद करण्यात आली आहे.

पुढील तीन ते चार तासांत मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी या पाच जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबई प्रादेशिक हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार, सध्या कोकण परिसरात पावसासाठी पोषक हवामान तयार होतं आहे. पुढील तीन ते चार तासांत मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी या पाच जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान याठिकाणी विजांच्या कडकडाटासह सुसाट वारे वाहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. याबाबतची माहिती देणारं ट्वीट हवामान विभागाचे शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी केलं
हेही वाचा-
- आजचे हवामान दि.२३ एप्रिल २०२४ : राज्यात वाढला तापमानाचा पारा, पुढचे 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा
- राज्यात सूर्य तापला, या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी, पहा आजचे हवामान कसे असेल | Havaman Andaj Today
- यंदा महाराष्ट्रात किती पाऊस पडेल? मान्सूनसाठीचा पहिला अंदाज जाहीर
- Havaman Andaj Today: राज्यात पावसाचे आगमन; काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, गारपीट व वादळी वाऱ्याचा इशारा
- Rain Alert: महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस आणि गारपिटीचे संकट; ऑरेंज अलर्ट जारी
खरंतर, सध्या छत्तीसगड परिसरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. यामुळे महाराष्ट्रात पावसासाठी पोषक हवामान तयार झालं आहे. पुढील दोन-तीन दिवस राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार (Heavy to Very Heavy Rainfall) पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान खात्याकडून (IMD alerts) वर्तवण्यात आली आहे. विदर्भात दिमाखात हजेरी लावल्यानंतर आता उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
हेही वाचा- राज्यात पुढील चार दिवसात इथे जोरदार पाऊस!; आजचा हवामान अंदाज
आज मुंबईसह पुणे, ठाणे, नाशिक रायगड या जिल्ह्यांसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. तर विदर्भात काही प्रमाणात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. आज हवामान खात्यानं नाशिक, ठाणे आणि रायगड या तीन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर मुंबई आणि पुण्याला येलो अलर्ट देण्यात आला आहे. आज सकाळपासूनच मुंबसह ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी परिसरात पावसाचं वातावरण तयार झालं असून ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे.