आज व उद्याचा हवामान अंदाज : राज्यात इथे मुसळधारेचा अंदाज | Maharashtra Weather Update

Maharashtra Weather Alert : पोषक हवामानामुळे राज्यात दोन ते तीन दिवस सर्वदूर पावसाचा अंदाज आहे. आज (ता. १4) कोकण, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात बहुतांशी ठिकाणी, तर दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रासह राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशाराही हवामान विभागाने वर्तविला आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सर्वसाधारण स्थितीच्या दक्षिणेकडे कायम असून, राजस्थानमधील कमी दाब क्षेत्रापासून गुजरात, शाजापूर, संभाळपूर ते बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्रापर्यंत सक्रिय आहे. तर अरबी समुद्रापासून गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशापर्यंत ते ठळक कमी दाबाच्या क्षेत्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम 
आहे.

कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढली
राजस्थान आणि गुजरात परिसरावर हवेचे कमी दाबाचे क्षेत्र असून, त्याला लागूनच समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. तर बंगालच्या उपसागरातील ठळक कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढत असून, त्याचे अतितीव्र कमी दाब क्षेत्रात रूपांतर होणार आहे. ही प्रणाली राज्यात पाऊस वाढण्यास पोषक ठरणार आहे.

हे पण वाचा :

कमी दाबाचे क्षेत्रामुळे राज्यात दोन दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आज (ता. १4) कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. तर कोकण, मराठवाडा, पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा, तसेच उत्तर मध्य महाराष्ट्र विदर्भात विजा, गडगडाटासह पावसाचा ‘येलो अलर्ट’ हवामान विभागाने दिला आहे.

 • मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट)
 • कोकण : ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी.
 • मध्य महाराष्ट्र : पुणे, सातारा, कोल्हापूर.
 • जोरदार पावसाचा इशारा (यलो अलर्ट)
 • कोकण : सिंधुदुर्ग, मुंबई.
 • मध्य महाराष्ट्र : नाशिक.
 • मराठवाडा : जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड.
 • विदर्भ : नागपूर, भंडारा, चंद्रपूर.
 • विजांसह पावसाचा इशारा (यलो अलर्ट)
 • मध्य महाराष्ट्र : नंदूरबार, धुळे, जळगाव.
 • विदर्भ : बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, गडचिरोली.

Related Posts

Ramchandra Sabale Havaman Andaj 48 hoursjpg

Weather Alert: येत्या 48 तासात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज

ramchandra sabale havaman andaj

Weather Update: राज्यात पुढील चार दिवस पावसाचा जोर कायम डाॅ रामचंद्र साबळे हवामान अंदाज महाराष्ट्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

X