Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग

Cyclone Gulab: राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, 7 जिल्ह्यांना रेड तर 10 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn
Cyclone Gulab: Heavy rains forecast in the state, 7 districts in red and 10 districts in orange alert

Cyclone Gulab: गुलाब चक्रीवादळामुळे राज्यात आज आणि उद्या मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

हवामान, 28 सप्टेंबर : महाराष्ट्रात आज आणि उद्या मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज (IMD predicts heavy to heavy rainfall in some districts of Maharashtra) हवामान खात्याने वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या गुलाब चक्रीवादळाची (Cyclone Gulab) तीव्रता आता कमी दाबाच्या तीव्र क्षेत्रात झाली आहे. यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. राज्यातील 7 जिल्ह्यांना रेड अलर्ट (Red Alert for 7 districts of Maharashtra) तर 10 जिल्ह्यांना हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

गुलाब चक्रीवादळामुळे 28 सप्टेंबर 2021 ते 1 ऑक्टोबर 2021 या कालावधीत कोकण किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यावर अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे नागरिकांनी आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये तसेच या कालावधीत योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

Responsive Weather Iframe
तुमच्या भागाचा लाईव्ह हवामान अंदाज

या कालावधीत कोकण किनारपट्टीच्या भागात 40-45 ते 60 किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. या कालावधीत समुद्र खवळलेला राहणार आहे. त्यामुळे मच्छिमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. यासोबतच समुद्र किनारपट्टीच्या भागातील गावांनाही सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

imd satellite image

imd satellite image

या 7 जिल्ह्यांना रेड अलर्ट (Red Alert for 7 districts) । आजचे हवामान

  1. पालघर
  2. ठाणे
  3. रायगड
  4. रत्नागिरी
  5. नाशिक
  6. धुळे
  7. जळगाव

या 10 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट । openweathermap

  1. मुंबई
  2. सिंधुदुर्ग
  3. नंदुरबार
  4. पुणे
  5. अहमदनगर
  6. औरंगाबाद
  7. जालना
  8. बीड
  9. परभणी
  10. हिंगोली

हे वाचलंत का? weather warnings

सोमवारी गुलाब चक्रीवादळ आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीभागात धडकले. यामुळे कृष्णा आणि श्रीकाकुलम या जिल्ह्यांत जोरदार पाऊस झाला आणि जनजीवन विस्कळीत झाले. आज आणि उद्या केवळ महाराष्ट्रासाठी अलर्ट जाहीर कऱण्यात आलेला नाहीये तर मध्यप्रदेश आणि गुजरातमधील काही भागांतही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पुढील हवामानाचा अंदाज । severe thunderstorm warning update

28 सप्टेंबर

कोकण हवामान अंदाज

  • बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
  • तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता
  • तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता.

मध्य महाराष्ट्र meteorology weather

  • बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
  • तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता
  • तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता.

मराठवाडा hawaman andaz

  • बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
  • तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता
  • तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता.

विदर्भ पावसाचा अंदाज

  • बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता
  • तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता
  • तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता

IMD Weather : जळगावात वीज कोसळून दोघांचा मृत्यू

जळगाव जिल्ह्यात काल दुपारपासून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू असून जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये वीज पडून एका महिलेसह बालिकेचा मृत्यू झाला आहे. यामध्ये रावेर तालुक्यातील विवरे खुर्द येथे नुरकी वाघेला ही 35 वर्षीय शेतमजूर महिला विहिरीवर गेली असता तिच्या अंगावर वीज कोसळून जागीच ठार झाली. तर जळगाव तालुक्यातील विटनेर येथे शेतात सोनाली राजेंद्र बारेला या 13 वर्षीय बालिकेवर वीज पडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.

नावIndian meteorology Department
विभागप्रादेशिक हवामान केंद्र मुंबई
पत्ताIMD Mumbai
दिनांक28 सप्टेंबर 2021
संकलनआजचे हवामान महाराष्ट्र 2021

Web title: Cyclone Gulab: Heavy rains forecast in the state, 7 districts in red and 10 districts in orange alert

मित्रांनो दररोज जिल्हानिहाय हवामान अंदाज मिळवण्यासाठी आणि त्याचबरोबर पंजाब डख हवामान अंदाज व हवामान विभागाचे अपडेट निशुल्क मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा आणि हि माहिती जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn
Follow us

---Advertisement---

LATEST Post

Close Visit Havaman Andaj

WhatsApp Icon Telegram Icon