Weather Update: गुलाब चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार किंवा अतिमुसळधार पावसाचा इशारा प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे.
हे वादळ रविवारी मध्यरात्री आंध्रप्रदेशातल्या श्रीकाकुम जिल्ह्याच्या किनाऱ्यावर धडकलं आहे.
महाराष्ट्रात त्याचे काय परिणाम जाणवतील याची माहिती हवामान विभागाच्या अधिकारी शुभांगी भूते यांनी दिली आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गुलाब चक्रीवादळ तयार झालं.
महाराष्ट्रात कुठे पाऊस पडण्याची शक्यता?
हवामान विभागाच्या माहितीनुसार, आजसाठी (27 सप्टेंबर) चंद्रपूर जिल्ह्याला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर नाशिक, पुणे, रत्नागिरी, रायगड, सातारा, नंदूरबार, परभणी, हिंगोली, लातूर, यवतमाळ, गडचिरोली या जिल्हयात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे

28 सप्टेंबरला मुंबईसह पालघर, ठाणे, रायगड, जळगाव, धुळे या जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्यास सांगितलं आहे. तर नंदूरबार, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, पुणे आणि रत्नागिरी या जिल्ह्यांत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
गुलाब चक्रीवादळाचा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांना धोका?
29 सप्टेंबरला मात्र चक्रीवादळाचा प्रभाव राज्यात कमी होताना दिसेल. पालघर, ठाणे, मुंबई, नाशिक, नंदूरबार, औरंगाबाद, जालना या जिल्ह्यांत पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हे वाचलंत का?
- Punjab Dakh यांचा एप्रिल महिन्यातील हवामान अंदाज ! ‘या’ तारखेला मुसळधार Rain पडणार पहा पंजाब डख हवामान अंदाज
- Weather Update | राज्यात आज ‘या’ ठिकाणी पावसाची शक्यता! हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज
- Maharashtra rain IMD Alert: 14 मार्चपासून ‘इतके’ दिवस राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस कोसळणार; ‘या’ जिल्ह्यात गारपीटीची शक्यता
- IMD Weather Alert : पावसाचे सावट कायम! येत्या २४ तासांत या राज्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार बरसणार; अलर्ट जारी
- Panjab Dakh Havaman Andaj | पंजाबराव डख यांचा 10 मार्चपर्यंत या 11 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा, पहा आजचा हवामान अंदाज
नाव | डॉ. रामचंद्र साबळे हवामान अंदाज |
---|---|
विभाग | प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई |
पत्ता | IMD Mumbai |
दिनांक | 27 सप्टेंबर 2021 |
संकलन | आजचे हवामान महाराष्ट्र 2021 |
मित्रांनो दररोज जिल्हानिहाय हवामान अंदाज मिळवण्यासाठी आणि त्याचबरोबर पंजाब डख हवामान अंदाज व हवामान विभागाचे अपडेट निशुल्क मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा आणि हि माहिती जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद
आत्ती पाऊस म्हणून म्हणून आम्ही कंटाळलो पण पाऊस नाही पावसाचे अंदाज सर्व आमच्या भागात खोटे ठरत आहेत
साहेब आपला massage मला लवकर मिळाला नाही मी सोयाबीन काडून टाकले आणि माझे नुकसान झाले तुमचा ग्रुप मला माहीत नव्हता माहीत असत तर माझं वेळीच नुकसान टळले असते.आज इतरांचे हवामान अंदाज खरे होत नाहीत पण तुमचे अंदाज खरे होत आहेत.