Weather Alert : राज्यावर पुन्हा आस्मानी संकट, ११ जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा

अंदमानच्या समुद्रात नवीन संकट उभ ठाकलं आहे. परिणामी हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय झालं असून पुढील २४ तासांत याची तीव्रता वाढण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात आलं आहे.

मुंबई : हिवाळा सुरू झाला असला तरी आता राज्यातून थंडी गायब झाली असून अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवेचा कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव आहे. मुंबईसह महाराष्ट्रात पावसासाठी पोषक हवामान असल्याचं हवामान खात्यानं सांगितलं. त्यामुळे राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

अंदमानच्या समुद्रात नवीन संकट उभ ठाकलं आहे. परिणामी हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय झालं असून पुढील २४ तासांत याची तीव्रता वाढण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात आलं आहे. पुढील पाच दिवस राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. पुढील पाच दिवसांसाठी राज्यात विविध ठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

वामान शास्त्रज्ञ के. एस. होसळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात १५ ते १८ नोव्हेंबरला मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे, कोकण, मध्य महाराष्ट्र, संलग्न मराठवाड्यात पाऊस होऊ शकतो. तर काही काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. १७ नोव्हेंबरच्या आसपास पूर्व-मध्य अरबी समुद्रात तसेच दक्षिण महाराष्ट्र गोवा किनारी भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला जात आहे.

दरम्यान, भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार सोमवारी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे तर तापमानाचा पारा रविवारप्रमाणेच चढा राहील. सोमवारीही कमाल तापमान ३६ अंशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. किमान तापमानातही २० नोव्हेंबरपर्यंत घट अपेक्षित नाही.

पावसाची शक्यता

उद्या, मंगळवार ते गुरुवारपर्यंत मुंबईत दुपारी किंवा संध्याकाळी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. बुधवारी पूर्व मध्य अरबी समुद्रात दक्षिण महाराष्ट्र आणि गोव्याच्या किनारपट्टीजवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले आहे. गुरुवारपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र संलग्न मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. रविवारीही राज्यात काही ठिकाणी पावसाने उपस्थिती लावली.

ढगाळ वातावरणामुळे द्राक्षाला फटका, बागायतदार चिंतेत

हवामान खात्याने राज्यात पावसाचा अंदाज वर्तवल्यानं आज अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. बारामती आणि इंदापूर तालुक्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण झाले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत पडला आहे.या ढगाळ वातावरणाने तरकारी पिके त्याचबरोबर पालेभाज्यांवर विविध रोगांचे संक्रमण होणार आहे..तसेच बारामती इंदापूर तालुक्यामध्ये द्राक्षाचे उत्पादन देखील मोठया प्रमाणात घेतले जाते. द्राक्षाच्या बागा ही या दोन्ही तालुक्यांमध्ये जास्त प्रमाणात आहेत.

Related Posts

jowad cyclon - jowad chakrivadal

cyclone Jawad : आसमानी संकट! आता येणार ‘जोवाड’ चक्रीवादळ? हवामान खात्याचा राज्यांना इशारा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

x
X