Weather Update: नमस्कार हवामान अंदाज महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण राज्यातील पुढील ४ दिवसांचा हवामान अंदाज (Weather Report) पाहणार आहोत. अधिक माहितीसाठी हा लेख पूर्ण वाचा आणि शेयर करा.
नैऋत्य मोसमी वारे देशातून परतून जवळपास एक महिना उलटून गेला आहे. तरीही यावर्षी महाराष्ट्रासह दक्षिण भारतात पावसाचा जोर कायम आहे. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात पावसाळा संपून उत्तरेकडील थंडीची लाट सुरू होते. पण यावर्षीचा हिवाळा मात्र याला अपवाद ठरला आहे.
लाईव्ह हवामान अंदाज (Todays Weather Report Live)
राज्यात अजूनही अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा तसाच आहे. तर अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि अंदमान समुद्र परिसरात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे अनेक ठिकाणांना पावसानं झोडपून काढलं आहे.

पुढील आणखी काही दिवस राज्यात पावसाची स्थिती कायम राहणार असल्याची माहिती हवामान (Weather Department) खात्याकडून देण्यात आली आहे. पुढील चार दिवस राज्यात अनेक ठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
आजचे हवामान अंदाज 2021 live
हवामान खात्यानं आज मुंबईसह, पुणे, ठाणे, पालघर, नंदुरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर, बीड, लातूर, नांदेड, सोलापूर, उस्मानाबाद, सांगली, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 19 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे.
हे वाचलंत का?
- Weather Update : राज्यात मुसळधार पावसाचा इशारा! कुठे ऑरेंज तर कुठे यलो अलर्ट; वाचा हवामान विभागाचा अंदाज
- Maharashtra Rain Update : येत्या चार ते पाच दिवसांत राज्यात ‘या’ जिल्ह्यात मुसळधार; वाचा हवामान विभागाचा अंदाज
- IMD Rain Alert : राज्यासाठी पुढील चार दिवस महत्त्वाचे; ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार मेघगर्जनेसह पाऊस, IMD कडून अलर्ट जारी
- Maharashtra Rain : महाराष्ट्रात पुन्हा पावसाच्या मुसळधारा? पहा आजचा नवीन हवामान अंदाज
- IMD Rain Alert : आज या जिल्ह्यांमध्ये तुफान पाऊस, पहा आजचा हवामान अंदाज
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तसेच गोव्यामध्ये सध्या पावसाचे सावट आहे. किरकोळ ठिकाणी सातत्याने पाऊस कोसळत आहे. आर्द्रता वाढत असल्याने ही परिस्थिती निर्माण झालेली आहे; मात्र येत्या ४८ तासांत हवामानामध्ये बदल होणार आहे. दक्षिण भागातील उष्णतेची लाट कमी झाल्यानंतर गोवा आणि कोकण किनारपट्टीवरील वातावरणात बदल होऊन पुन्हा एकदा हळूहळू थंडी जाणवायला लागेल; मात्र थंडीचा कडाका वाढायला आठवडा लागण्याची शक्यता आहे.
हवामान उद्या सकाळी Weather Report For Tommorow
पुढच्या दोन दिवसांनंतर कोकणातील काही भागांमध्ये किरकोळ ठिकाणी पाऊस होऊ शकतो. दोन दिवस ढगाळ वातावरण कायम राहील, असेही कश्यपी यांनी नमूद केले.
कोकण किनारपट्टीला गेल्या चार दिवसांपासून हवामान बदलाचा मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी पावसाची रिपरिप आजही सुरू आहे. त्यामुळे शेती आणि शेतीपूरक व्यवसायावर परिणाम झाला आहे. काही ठिकाणी भात कापणीची कामे अर्धवट स्थितीत आहेत. भात कापल्यानंतर गुरांचा चारा म्हणून शिल्लक ठेवलेले गवतही या अवकाळी पावसामध्ये भिजत आहे.
फळधारणाही धोक्यात
हवामानाच्या बदलामुळे आगामी काळातील हापूस, आंबा आणि काजू उत्पादनावरही मोठा परिणाम होणार आहे. फळ पिकांना फुटवा येण्यासाठी आणि आवश्यक अशी फळधारणा होण्यासाठीची नैसर्गिक प्रक्रिया लांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा कोकणी मेव्यासह आर्थिक कणा असलेला आंबा आणि काजू उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
नाव | भारतीय हवामान विभाग यांचा अंदाज |
---|---|
विभाग | प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई |
पत्ता | IMD Mumbai व IMD New Delhi |
दिनांक | 21 नोव्हेंबर 2021 |
फेसबुक | दररोज हवामान अंदाजासाठी फेसबुक पेज लाईक करा |
हवामान अंदाज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा | |
संकलन | आजचे हवामान महाराष्ट्र 2021 |
शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अंदाज मिळवण्यासाठी व पंजाब डख हवामान अंदाज whatsapp group साठी आपल्या वेबसाईटचे नोटिफिकेशन सुरू करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अवश्य जॉईन व्हा. धन्यवाद!