Maharashtra Weather Update: राज्याच्या विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पुढील तीन चार दिवस मान्सून सक्रिय राहणार आहे, अशी माहिती के.एस.होसळीकर यांनी ट्विट करत दिली आहे.
K.S. Hosalikar Twitter
मुसळधार पावसाने अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक गावांना जोडणारे रस्त्यावर पाणी आल्याने याचा वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मुंबई, ठाणे परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गेली 2 दिवस पुणे, कोल्हापूर, मुंबई, रायगड, रत्नागिरी,नंदूरबार, वर्धा, अहमदनगर, बुलडाणा या भागात पावसाने चांगलेच झोडपले आहे. तर आजही राज्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रासह कोकणालाही ऑरेज् अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर नाशिक आणि पालघर जिल्ह्यांनाही ऑरेज अलर्ट देण्यात आला आहे.

पुढील 3 ते 4 दिवस मान्सून सक्रिय
पुढील 3 ते 4 दिवस राज्यात मान्सून सक्रिय राहणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात याचा मोठा परिणाम होऊ शकतो, असा इशारा देण्यात आला आहे. रायगडमध्ये आज आणि उदया (गुरुवारी) ऑरेंज अलर्ट, तर रत्नागिरीमध्ये आज (बुधवारी) ऑरेंज अलर्ट आहे. त्यानंतर दोन्ही जिल्ह्यांमध्ये शनिवारपर्यंत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र सिंधुदुर्गात शुक्रवारपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज दिसून येत आहे.
ढगाळ वातावरणामुळे चिंता
सतत ढगाळ वातावरण घोंगावत असल्याने शेतकऱ्यांतून चिंता व्यक्त होत आहे. पाऊस झाल्यानंतर पुरेसा सूर्यप्रकाश पडण्याची गरज आहे. मात्र, सतत ढगांचे घोंगण असल्याने शेंग अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाऊस व ऊन पडल्यास पिकांच्या वाढीसाठी व शेंगा भरण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होते. मात्र, एकदा पाऊस सुरू झाला की आठ दिवसांपेक्षा अधिक काळ पुरेसे सूर्यदर्शन होत नाही. यामुळे उत्पन्नाला फटका बसतो.
परतीचा पाऊस सुरू
औरंगाबाद एमजीएम अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर म्हणाले की, परतीच्या पावसाला सुरूवात झाली असून काही दिवस तीव्रता अधिक राहिल. त्यानंतर हळूहळू तीव्रता कमी होईल. परतीचा पाऊस सर्वच जिल्ह्यात किंवा भागात पडण्याची शक्यता कमी आहे. जेथे अनुकूल वातावरण होईल तेथे बरसात होईल.
इतर सर्व हवामान अंदाज
- Weather Update : राज्यात मुसळधार पावसाचा इशारा! कुठे ऑरेंज तर कुठे यलो अलर्ट; वाचा हवामान विभागाचा अंदाज
- Maharashtra Rain Update : येत्या चार ते पाच दिवसांत राज्यात ‘या’ जिल्ह्यात मुसळधार; वाचा हवामान विभागाचा अंदाज
- IMD Rain Alert : राज्यासाठी पुढील चार दिवस महत्त्वाचे; ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार मेघगर्जनेसह पाऊस, IMD कडून अलर्ट जारी
- Maharashtra Rain : महाराष्ट्रात पुन्हा पावसाच्या मुसळधारा? पहा आजचा नवीन हवामान अंदाज
- IMD Rain Alert : आज या जिल्ह्यांमध्ये तुफान पाऊस, पहा आजचा हवामान अंदाज
तुमच्या जिल्ह्याचा हवामान अंदाज पहा
नाव | पंजाब डख (Panjab Dakh Patil Weather Forecast) |
---|---|
विभाग | पंजाबराव डख पाटील हवामान अंदाज |
गाव | मु.पो .गुगळी धामणगाव ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा) |
दिनांक | 14 सप्टेंबर 2022 |
फेसबुक | दररोज हवामान अंदाजासाठी फेसबुक पेज लाईक करा |
हवामान अंदाज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा | |
संकलन | आजचे हवामान महाराष्ट्र 2022 |
पंजाब डख हवामान अंदाज WhatsApp Group
शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अभ्यासक Panjabrao Dakh Patil Weather Forecast यांचा अंदाज मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटचे नोटिफिकेशन सुरू करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अवश्य जॉईन व्हा. धन्यवाद