Maharashtra Rain Updates : दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टी भागांत कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यानं राज्यात मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज. पहाटेपासूनच अनेक भागांत पावसाची कोसळधार.
गेल्या काही दिवसात दडी मारलेल्या पावसाने या महिन्यात चांगलीच हजेरी लावली. राज्यसह देशभरात पावसाने धुमाकूळ घातला आहे. राज्यासह देशभरात अनेक ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर अनेक ठिकाणची धरणे दुथडी भरून वाहू लागली आहेत.
Maharashtra Monsoon Update Today
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोकण आणि मध्य महाराष्ट्र तसेच घाट परिसरासाठी पुढील पाच दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. तर मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणातही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Havaman Andaj Today Maharashtra
त्याचबरोबर मुंबईत पहाटेपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. मुसळधार पावसामुळे मच्छिमारांनाही पुढील 2 दिवसांत समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.
तर मुंबईसह पुणे, पश्चिम महाराष्ट्रात आजपासून पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भात पुढील तीन दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर आज अमरावती, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज मराठावाड्यासाठी देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
ओडिसा, पश्चिम बंगालमध्येही ऑरेंज अलर्ट जारी
देशभरात पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. देशात अनेक राज्यामध्ये हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आले आहेत. तर काही भागात पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. ओडिसातील हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केल्यानंतर परिस्थितीचा सामना करण्यासाठीची सर्व तयारी करण्यास सुरवात केली आहे.
त्याचबरोबर हवामान खात्याकडून मच्छिमारांना उत्तर-पश्चिम आणि पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरापासून आणि आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीपासून समुद्रात जाऊ नका असे आवाहन केले आहे. सद्यपरिस्थितीत सुरू असणाऱ्या पावसामुळे समुद्राची स्थिती खराब राहण्याची शक्यता आहे. ओडिसामधील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस चालू आहे.
महाराष्ट्रातही पावसाचा तडाखा
हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार, दक्षिण ओदिशाच्या किनारपट्टीभागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने राज्यात मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. यामुळे विदर्भात विजांच्या कडकडाटासह तीन दिवस मुसळधार पाऊस तर मराठवाडा भागात आज मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. पुण्यात रविवारीच सलग तीन-चार तास पावसानं हजेरी लावल्यानं नागरिकांचे हाल झाले. सोमवारीही अनेक शहरांमध्ये पावसाने हजेरी लावली.
शिर्डीत मुसळधार पाऊस
शिर्डीसह परिसरात मुसळधार पाऊस बरसत आहे. काल संध्याकाळपासून शिर्डीत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. राहता, कोपरगाव, शिर्डी, बाभलेश्वर परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे.
बुलढाण्यात पावसाची संततधार
बुलढाणा जिल्ह्यात गेल्या 36 तासांपासून अनेक भागांत पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत झालं असून नदी नाले दुधडी भरून वाहत आहेत. काही ठिकाणी शेतात पाणी तुंबल्यामुळे शेतकऱ्यांची पिकं ही पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.
वर्ध्यात दोन दिवसांपासून पावसाची संततधार
वर्धा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरु आहे. ग्रामीण भागांतील जनजीवन विस्कळीत झालं आहे. हिंगणघाट तालुक्यातील कान्होली गावाला पाण्याचा वेढा आहे. 2 ते 3 फूट पुराच्या पाण्यातून नागरिकांना महत्वाच्या कामासाठी वाट काढावी लागत आहे. तर वर्धमनेरी-आर्वी मार्ग बंद झाला आहे. तसेच चानकी-भगवा मार्ग बंद झाला आहे. अनेक शेतात पुन्हा पाणी साचल्याच पाहायला मिळत आहे.
कोणत्या भागात ऑरेंज आणि यलो अलर्ट?
हवामान विभागाच्या माहितीनुसार कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरासाठी पुढील पाच दिवस पावासाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईसाठी आजपासून पुढील तीन दिवस काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. विदर्भात पुढील तीन दिवस सर्वत्र विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
विदर्भात पुढील दोन दिवस सर्वत्र विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज अमरावती, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच इतर ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नांदेड आणि हिंगोलीत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळं आज मराठावाड्यासाठी देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
इतर सर्व हवामान अंदाज
- Punjab Dakh यांचा एप्रिल महिन्यातील हवामान अंदाज ! ‘या’ तारखेला मुसळधार Rain पडणार पहा पंजाब डख हवामान अंदाज
- Weather Update | राज्यात आज ‘या’ ठिकाणी पावसाची शक्यता! हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज
- Maharashtra rain IMD Alert: 14 मार्चपासून ‘इतके’ दिवस राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस कोसळणार; ‘या’ जिल्ह्यात गारपीटीची शक्यता
- IMD Weather Alert : पावसाचे सावट कायम! येत्या २४ तासांत या राज्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार बरसणार; अलर्ट जारी
- Panjab Dakh Havaman Andaj | पंजाबराव डख यांचा 10 मार्चपर्यंत या 11 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा, पहा आजचा हवामान अंदाज
- Panjabrao Dakh Weather Report | ‘या’ जिल्ह्यांमध्ये येत्या आठवड्यात पाऊस पडण्याची शक्यता, पंजाबराव डख यांचा अंदाज
तुमच्या जिल्ह्याचा हवामान अंदाज पहा
नाव | पंजाब डख (Panjab Dakh Patil Weather Forecast) |
---|---|
विभाग | पंजाबराव डख पाटील हवामान अंदाज |
गाव | मु.पो .गुगळी धामणगाव ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा) |
दिनांक | 13 सप्टेंबर 2022 |
फेसबुक | दररोज हवामान अंदाजासाठी फेसबुक पेज लाईक करा |
हवामान अंदाज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा | |
संकलन | आजचे हवामान महाराष्ट्र 2022 |
पंजाब डख हवामान अंदाज WhatsApp Group
शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अभ्यासक Panjabrao Dakh Patil Weather Forecast यांचा अंदाज मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटचे नोटिफिकेशन सुरू करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अवश्य जॉईन व्हा. धन्यवाद