आजचे हवामान अंदाज महाराष्ट्र : पावसाला पोषक हवामान झाल्याने राज्याच्या कमाल तापमानात घट झाली आहे. 3 ते 9 डिसेंबर या आठवड्याच्या कालावधीत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे. तर वाढलेले किमान तापमान कमी होऊन थंडीत वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
राज्यात थंडी परतणार …
गत आठवड्याच्या सुरुवातीला उघडीप होती. मात्र अखेरीस राज्यात पावसाला सुरुवात झाली 1 डिसेंबर व 2 डिसेंबर रोजी राज्याच्या अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. 3 ते 9 डिसेंबर या आठवड्यामध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे. राज्यात असलेला पाऊस आणि उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात घट होत आहे.
पहाटेचे तापमानात घट होणार असल्याने राज्यात थंडी परतण्याची शक्यता आहे तीन ते नऊ डिसेंबर या कालावधीत कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भात किमान तापमान सरासरीच्या तुलनेत शून्य ते दोन अंशांनी कमी राहण्याची शक्यता असून उर्वरित राज्यात किमान तापमान सरासरीपेक्षा शून्य ते दोन अंशांनी अधिक राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
देशाला ‘जवाद’ चक्रीवादळाचा धोका , यंत्रणा अलर्ट
राज्यात अनेक ठिकणी मुसळधार पाऊस झाला आहेत्यामुळे अनेक शेतकरी आणि व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे, तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या शेतमालाचं देखील नुकसान झाल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता पुर्वकिनारपट्टीवर चक्रीवादळाचा धोका निर्माण झालाय. बंगालच्या उपसागरात जवाद नावाचं चक्रीवादळ निर्माण झालं होतं.
आज हे चक्रीवादळ विशाखापट्टनम किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे आंध्र आणि ओडिसाच्या किनारपट्टीवर मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर ताशी 50 ते 55 किमी ते 100 किमीपर्यंत वारं वाहिलं, अशी माहिती देखील हवामान खात्याने दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या जवाद चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.
हे पण वाचा
आंध्रप्रदेश आणि ओडिसा राज्यांना अलर्ट जारी केला असून तब्बल 24 रेल्वेगाड्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर काही जिल्ह्यात शाळा देखील बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर पश्चिम बंगालमध्ये देखील अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हे पण वाचा –
- पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज : ‘या’ तारखेपासून थंडीची तीव्रता वाढणार, 15 डिसेंबर नंतर पुन्हा पावसाची शक्यता!
- पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज ! ‘या’ भागात पावसाची शक्यता, तुमच्याकडे कसे राहणार हवामान? वाचा…
- NEW आजचे सोयाबिन बाजार भाव 26 सप्टेंबर 2024 Soyabin Bajar bhav
- राज्यात पुढील २ दिवस मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ भागांत धो-धो बरसणार, कसं असेल हवामान?
- Panjabrao Dakh Havaman Andaj | राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार; या जिल्ह्यांमध्ये जोरदार बरसणार
सौजन्य – हॅलो कृषी
नाव | भारतीय हवामान विभाग यांचा अंदाज |
---|---|
विभाग | प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई – Jawad Chakrivadal Update |
पत्ता | IMD New Delhi |
दिनांक | 4 डिसेंबर 2021 |
फेसबुक | दररोज हवामान अंदाजासाठी फेसबुक पेज लाईक करा |
हवामान अंदाज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा | |
संकलन | आजचे हवामान महाराष्ट्र 2021 |
शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अंदाज मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अवश्य जॉईन व्हा. धन्यवाद!