Maharashtra Monsoon 2023 : नमस्कार शेतकरी मित्रांनो हवामान अंदाज महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे राज्यात गेल्या दोन दिवसापासून पावसांना पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावलेली आहे आणि पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे हवालदिल झालेला शेतकरी आणि पावसाच्या प्रतीक्षेत असलेला बळीराजा आता पुन्हा आपल्या शेतीच्या कामांना विद्युत असून राज्यामध्ये पेरणी आणि त्याचपाठोपाठ लागवडीच्या इतर कामांना सुरुवात झालेली आहे.
अनुक्रमणिका
ToggleMaharashtra weather forecast today
Monsoon 2023 | राज्यात मराठवाडा आणि विदर्भात अद्यापही पेरणीयोग्य पाऊस झाला नाहीय. त्यामुळे शेतकरी पावसासाठी आकाशाकडे डोळे लावून बसलेले आहेत. मुंबई,कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भाग वगळता राज्यात जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.
पाऊस अजून किती दिवस आहे?
यादरम्यान गुजरात ते केरळ किनारपट्टीवर असलेली ढगांची द्रोणीय स्थिती यामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालं असून बुधवारी राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
उद्या पाऊस आहे का ?
हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, मुंबई, ठाण्यामध्ये काही भागात बुधवारी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो. तसेच रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गामध्ये तुरळक ठिकाणी अतितीव्र मुसळधार स्वरूपाच्या पावसाचाही अंदाज आहे.
पाऊस बातम्या आजचा हवामान अंदाज
दोन दिवसांपासून मुंबईत पावसाने विश्रांती घेतली होती. त्यानंतर मंगळवारी पावसाने पुन्हा पुनरागमन केलं. पहाटेपासूनचं मुंबईत पावसानं जोरदार हजेरी लावली. मुंबईतील दादर, लोअर परळ, परळ भागात पावसाला जोरदार पाऊस झाला. दरम्यान आता पुढील ७२ तासांत पावसाचा जोर आणखीच वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
हे पण वाचा
Koo AppK S Hosalikar @Hosalikar_KS 4Jul:IMD GFS indicate;likly of hevy-very hevy RF ovr westcoast on 5,6Jul,with RF intensity moving to N Konkan on 6th. Int of Mah me RF IMD GFS नुसार 5,6 जुलै,पश्चिम किनारपट्टीवर मुसळधार-अतिमुसळधार पावसाची शक्यता.6 ला तीव्रता उत्तर कोकणात सरकणार.राज्याच्या अातल्या भागात मध्यम पाऊस – आम्ही कास्तकार (@AmhiKastkar) 6 July 2023
राज्यात कुठे होणार मुसळधार?
हवामान खात्याकडून पुढचे ४ दिवस मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात तर विदर्भातील बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपुर जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
उद्याचा हवामान अंदाज
याशिवाय पुणे, नाशिक, पालघर आणि सातारा जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर कोकणातील रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा म्हणजेच ऑरेज अलर्ट हवामान विभागानं दिला आहे.