Havaman Andaj : ऑगस्ट महिन्यात दडी मारलेला पाऊस आता राज्यात पुन्हा परतणार आहे. राज्यामध्ये आता श्रावण सरी सुरू होणार आहे. शुक्रवारी मराठवाड्यातील काही ठिकाणी पाऊस झाला आहे त्याचबरोबर विदर्भात देखील अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे.
Vidarbha Rain : राज्यात पावसानं उघडीप घेतलेली असताना शेतकऱ्यांचे डोळे पावसाकडे लागून राहिले आहेत. पाऊस सुरु न झाल्यास पीक हातून जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
गेल्या आठवड्याहून अधिक काळ पावसाने पाठ फिरवल्याने सर्वत्र शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. जुलै महिन्याच्या जोरदार पावसाने सरप्लस वर गेलेल्या पावसाच्या सरासरीत घसरण दिसून येत आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने चिंताजनक बाब म्हणजे पिकांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. विदर्भात पावसाने अचानक घेतलेल्या विश्रांतीने धरणातील पाणीसाठा कमी होण्याची भीती असून विदर्भातील अनेक भागात शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविण्यात आलेल्या अंदाजानुसार आगामी काळात कसा असेल पावसाचा अंदाज हे जाणून घेऊया.
दरम्यान २५ ऑगस्ट पर्यंत राज्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज पुणे हवामान विभागाने व्यक्त केला आहे यामुळे शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळाला आहे चांगला पाऊस पडला तर पीक देखील चांगले येईल अशी आशा शेतकऱ्यांना आहे.
हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार शनिवारपासून कोकण आणि विदर्भामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. नागपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तर मराठवाड्यामधील सर्व जिल्हे आणि जळगावला पावसाचा यलोअलर्ट देखील जरी करण्यात आला आहे.
18 Aug, 11 pm, latest satellite obs indicates mod to intense clouds over parts of central India covering the parts of East MP, Vidarbha and adj areas. pic.twitter.com/Wjlvm8DT63
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 18, 2023अनुक्रमणिका
Toggleहे पण वाचा
आजचे हवामान अपडेट: महाराष्ट्रात तापमानाचा कहर! 37 अंशांच्या पार, नागरिक त्रस्त
मोठी बातमी ! ऐन हिवाळ्यात ‘या’ भागात पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळणार, हवामान खात्याची चेतावणी
पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज : ‘या’ तारखेपासून थंडीची तीव्रता वाढणार, 15 डिसेंबर नंतर पुन्हा पावसाची शक्यता!
पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज ! ‘या’ भागात पावसाची शक्यता, तुमच्याकडे कसे राहणार हवामान? वाचा…
NEW आजचे सोयाबिन बाजार भाव 26 सप्टेंबर 2024 Soyabin Bajar bhav
पुणे जिल्ह्यात पाऊस
पुण्यात देखील हवामान विभागाने यलो अलर्ट जरी केला आहे. पुढचे तीन दिवस पुणे शहरासह जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवला आहे. तर मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, ठाणे या जिल्ह्यांमध्ये देखील पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसाच्या खंडानंतर पावसाने हजेरी लावल्याचे पाहायला मिळत आहे. मागच्या दोन दिवसापासून पुण्यामध्ये देखील हलक्या प्रमाणात पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले असून लवकरच मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तविला आहे.
शेतकरी आनंदात
अनेक दिवसाच्या विश्रांतीनंतर आता थोडीफार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे अनेक शेतकऱ्यांची पिके पावसाअभावी सुकू लागली होती अशा शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळाला आहे. चांगला पाऊस पडला तर पिके देखील चांगले येतील असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
विदर्भात १९ ऑगस्ट नंतर सर्वत्र पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर दिनांक १९ ऑगस्ट रोजी भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती या ठिकाणी सर्वत्र पाऊस होईल असा अंदाज नागपूर प्रादेशिक विभागाच्या वतीने वर्तवण्यात आला आहे. पावसाच्या गैरहजेरीमुळे नागपूरसह अनेक जिल्ह्यात उकाडा जाणवत असल्याने शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांना देखील पावसाची प्रतीक्षा करत आहे.