23 ऑगस्ट 2023 : ऑगस्ट महिन्यात सुटीवर गेलेला पाऊस राज्यात परतला आहे. राज्यातील अनेक भागांत आता श्रावण सरीचा अनुभव येत आहे. पाऊस मुसळधार नसला तरी रिमझिम स्वरुपात अनेक भागांत पडत आहे. विदर्भात पावसाचा ऑरेंज अन् यलो अलर्ट काही जिल्ह्यांना दिला आहे. राज्यात २५ ऑगस्टपर्यंत पाऊस कायम असेल, असा अंदाज पुणे हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मुंबईत वसई, विरारमध्ये सकाळपासून पाऊस सुरु झाला आहे. पुणे जिल्ह्यातील काही भागांत पाऊस पडत आहे.
कुठे कोणता अलर्ट
राज्यातील नागपूर आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट रविवारी दिला आहे. या भागांत मुसळधार पाऊस कोसळणार आहे. गडचिरोली, गोंदिया, अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे.
मराठवाड्यात नांदेड, हिंगोली, जालना, बीड , लातूर या जिल्ह्यास यलो अलर्ट दिला आहे. तसेच जळगाव जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट रविवारसाठी जारी केला आहे. सोमवारी संपूर्ण मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात सोमवारसाठी यलो अलर्ट दिला आहे.
बंगालच्या उपसागरात बदल
उत्तर-पूर्व बंगालच्या उपसागरात बदल झाले आहे. या भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे.यामुळेच हिमाचल प्रदेशत सध्या अतिवृष्टी झाली आहे. आता मात्र हा कमी दाबाचा पट्टा मध्य प्रदेशकडे आला आहे. यामुळे राज्यात विदर्भात पाऊस सुरु झाला आहे. तसेच कोकण, मध्य महाराष्ट्र् आणि मराठवाडा या भागांत हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी पुढील पाच दिवस पडतील, असा अंदाज पुणे हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
हे सुद्धा वाचा
- Maharashtra Weather Forecast : राज्यात पुढचे ७२ तास मुसळधार पाऊस; मुंबई, पुण्यासह ८ जिल्ह्यांना अलर्ट जारी
- Weather Update : राज्यात मुसळधार पावसाचा इशारा! कुठे ऑरेंज तर कुठे यलो अलर्ट; वाचा हवामान विभागाचा अंदाज
- Maharashtra Rain Update : येत्या चार ते पाच दिवसांत राज्यात ‘या’ जिल्ह्यात मुसळधार; वाचा हवामान विभागाचा अंदाज
- IMD Rain Alert : राज्यासाठी पुढील चार दिवस महत्त्वाचे; ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार मेघगर्जनेसह पाऊस, IMD कडून अलर्ट जारी
- Maharashtra Rain : महाराष्ट्रात पुन्हा पावसाच्या मुसळधारा? पहा आजचा नवीन हवामान अंदाज
- IMD Rain Alert : आज या जिल्ह्यांमध्ये तुफान पाऊस, पहा आजचा हवामान अंदाज
मुंबईत पाऊस
विदर्भात पाऊस सुरु असताना मुंबईत पाऊस सुरु झाला आहे. वसई, विरारसह ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर आणि बदलापूरमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. सध्या मुंबईतील सातही तलावांत एकूण ८३.५१ टक्के जलसाठा आहे. यामुळे मुंबईची पाण्याची चिंता दूर झाली आहे.
गोसीखुर्द धरणाचे दरवाजे उघडले
दोन दिवसांपासून होणाऱ्या पावसामुळे गोसीखुर्द धरणाचे दरवाजे उघडले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे धरणाचे सर्व 33 गेट उघडले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास पुढील काही तासांत पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार आहे.
आजचा हवामानाचा अंदाज
नाव | हवामान अंदाज महाराष्ट्र राज्य |
---|---|
विभाग | भारतीय हवामान शास्त्र विभाग |
पत्ता | हवामान विभाग – IMD |
दिनांक | 21 ऑगस्ट 2023 |
संकलन | आजचे हवामान महाराष्ट्र 2023 |
पंजाब डख हवामान अंदाज Whatsapp Group
मित्रांनो दररोज जिल्हानिहाय हवामान अंदाज मिळवण्यासाठी आणि त्याचबरोबर पंजाब डख हवामान अंदाज व हवामान विभागाचे अपडेट निशुल्क मिळवण्यासाठी खालील कोपऱ्यात येणाऱ्या बटनावर क्लिक करा.