Hawaman Andaz monsoon Update 2022: राज्याच्या पश्चिम भागात मॉन्सून सक्रिय झाल्याने कोकणासह घाटमाथ्यावर पावसाला सुरवात झाली आहे. सोमवारी (ता. २०) कोकणासह विदर्भात मुसळधार पाऊस. तर दक्षिण मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रातही हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. कोकणात वेधशाळेने ऑरेंज अलर्ट दिला आहे. मॉन्सून संपूर्ण राज्य व्यापले असून, कोकण, विदर्भासह राज्याच्या विविध भागात ढगाळ हवामान झाले आहे. कोकणच्या विविध भागात शनिवारपासूनच पावसाला सुरवात झाली आहे. हरियाना आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.
विदर्भापासून तामिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. विदर्भ, मराठवाड्यासह पूर्व भारतात, तर अरबी समुद्रातून मॉन्सूनचे प्रवाह वाढल्याने किनारपट्टी भागात ढगांची दाटी झाली आहे. कोकणात आजपासून (ता. २०) जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पुण्यात सोमवारनंतर पाऊस
सक्रिय होणाऱ्या मॉन्सूनमुळे सोमवार (ता.२०) नंतर शहरासह जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. विशेष करून घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. आठवडाभर आकाश सामान्यतः ढगाळ आणि दुपारनंतर तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाचे संकेत देण्यात आले आहे. हा आठवडा पुणेकरांसाठी पावसाचा ठरण्याची जास्त शक्यता आहे. रविवारी शहर व परिसरात दिवसभर ढगाळ हवामान होते. त्यामुळे सरासरी कमाल तापमान ३२.३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.
अति जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट)
कोकण : पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.
जोरदार पावसाचा इशारा (यलो अलर्ट)
- मध्य महाराष्ट्र : सातारा, कोल्हापूर,
- विदर्भ : यवतमाळ, चंद्रपूर.
- विदर्भ : बुलडाणा, अकोला, वाशीम
हे पण वाचा:
- आजचे हवामान दि.२३ एप्रिल २०२४ : राज्यात वाढला तापमानाचा पारा, पुढचे 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा
- राज्यात सूर्य तापला, या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी, पहा आजचे हवामान कसे असेल | Havaman Andaj Today
- यंदा महाराष्ट्रात किती पाऊस पडेल? मान्सूनसाठीचा पहिला अंदाज जाहीर
- Havaman Andaj Today: राज्यात पावसाचे आगमन; काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, गारपीट व वादळी वाऱ्याचा इशारा
- Rain Alert: महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस आणि गारपिटीचे संकट; ऑरेंज अलर्ट जारी
- आजचे हवामान अपडेट: महाराष्ट्रात तापमानाचा कहर! 37 अंशांच्या पार, नागरिक त्रस्त
नाव | हवामान अंदाज महाराष्ट्र राज्य |
---|---|
विभाग | भारतीय हवामान शास्त्र विभाग |
पत्ता | हवामान विभाग – IMD |
दिनांक | 19 जून 2022 |
संकलन | आजचे हवामान महाराष्ट्र 2022 |
पंजाब डख हवामान अंदाज Whatsapp Group
मित्रांनो दररोज जिल्हानिहाय हवामान अंदाज मिळवण्यासाठी आणि त्याचबरोबर पंजाब डख हवामान अंदाज व हवामान विभागाचे अपडेट निशुल्क मिळवण्यासाठी इथे क्लिक करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा आणि हि माहिती जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद